सिंचन विहीर योजनेतून वगळलेल्या गावांनाही मिळणार लाभ : आ. कुणाल पाटील
धुळे : रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीरींचा लाभ आता धुळे तालुक्यातील सर्वच गावातील लाभासाठी पात्र असलेल्या शेतकर्यांना मिळणार आहे. भूजल पातळीच्या कमतरतेअभावी वगळण्यात आलेल्या गावांचा पुर्नसर्व्हेक्षण करुन सदर गावांना लाभ मिळवून देण्यासाठी आ. कुणाल पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुनसर्व्हेक्षण केल्याने आता धुळे तालुक्यातील सर्वच गावांतील लाभासाठी पात्र असलेल्या शेतकर्यांना सिंचन विहीरींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
आ. कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर रोजी आ. पाटील यांच्या कार्यालयात पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जि. प. धुळे यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत सिंचन विहीरींच्या योजनेबाबत आढावा घेतला.
भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार जमीनीत पाण्याची कमतरता असल्याने धुळे तालुक्यातील 57 गावे महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीरींच्या लाभातून वगळण्यात आली होती. छाननी करतांना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जिल्हा परिषद, धुळे यांनी धुळे तालुक्यातील 57 गावांचा प्रतिकूल अहवाल दिल्याने या छाननी प्रक्रीयेतून ही गावे वगळण्यात आली होती. त्यामुळे या 57 गावांतील 1008 प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आल्याने या गावातील एकही शेतकर्यांला सिंचन विहीर मंजुर होणार नव्हती. म्हणून या गावतील कार्यकर्ते आणि शेतकर्यांनी या 57 गावांनाही सिंचन विहीरींचा लाभ मिळावा अशी मागणी केल्याने आ. कुणाल पाटील यांनी गेल्या महिन्यात बैठक घेतली होती. त्या बैठकित वगळण्यात आलेल्या गावांचा पुर्नसर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पुर्नसर्व्हेक्षण करुन भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी विभागीय कार्यालयात अहवाल सादर केला होता. त्या गावातून आलेल्या सिंचन विहीरींच्या प्रस्तावाची छाननी करुन पात्र लाभार्थ्याचे स्थळ निरीक्षण केले जाणार आहे. त्यामुळे आता धुळे तालुक्यातील सर्व गावातील पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहीरींचा लाभ मिळणार असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बैठकीला आ. कुणाल पाटील यांच्यासोबत गटविकास अधिकारी गणेश चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, भूजल सर्व्हेक्षक ललित ब्रिजलाल वाईकर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक साहेबराव खैरनार, माजी पं. स. सदस्य पंढरीनाथ पाटील, संचालक एन. डी. पाटील, संचालक कुणाल पाटील, हर्षल साळुंके, माजी संचालक माधवराव पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा