धुळे जिल्ह्यात 381 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
धुळे : जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या संरक्षणार्थ पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन मोडमध्ये आले असून, पोलिसांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे रोड रोमिओंची हवा टाईट झाली आहे. विविध महाविद्यालयांच्या परिसरात मंगळवारी 381 टवाळखोरांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हाती घेतलेल्या या धडक मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धुळे जिल्ह्यात विविध महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृह येथे टवाळखोरांवर कारवाई करण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेमध्ये महाविद्यालय, शाळा येथील भागांमध्ये विनाकारण फिरणा-यांवर कारवाई करण्यात आली.
ओळखपत्र नसलेल्यांची झडती घेण्यात आली. सदर भागात मुद्दाम अती वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, सायलेंसरचा मोठा आवाज करून बुलेट चालविणे इत्यादी केसेस करण्यात आल्या. दामिनी पथक तसेच पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांकडुन कॉलेजेसमध्ये विद्यार्थीनींना समुपदेशन करण्यात आले व तक्रार असल्यास निर्भिडपणे पोलीसांकडे जाण्याबाबत कळविण्यात आले.
या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात झाली कारवाई : विद्यावर्धीनी, एसएसव्हीपीएस, झेड. बी. पाटील कॉलेज, नॅशनल ऊर्दू हायस्कूल, भावरी महाविद्यालय, सी.एस. बाफना हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श हायस्कुल, निजामपुर, गर्ल हायस्कूल, बीओडी कॉलेज, नूतन महाविद्यालय, दोंडाईचा, सना हायस्कूल, चाळीसगांव रोड धुळे, देवपूरातील खाजगी क्लासेस, बाफना स्कूल धुळे शहर, एस. टी. गुजर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बेटावद, एसएसव्हीपीएस कॉलेज, शिंदखेडा, मुलींचे वसतिगृह, शिरपूर तालुका समुपदेशन.
सदर कारवाईत जिल्हयात ३८१ टवाळखोरांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा