धुळे शहरात भूखंड हडप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धुळे : बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड हडपणार्या टोळीचा एलसीबीने छडा लावला आहे. या प्रकरणात एलसीबीने दोघांच्या मुसक्या आवळल्या असून आठ जणांविरूद्ध ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जेबुनिसा मोहम्मद शफी (70, रा. राजस्थान) यांच्या नावावर देवपूर भागात स. न. 74/1 ब/1 क धील प्लॉट नं. 32 सि.स. नं. क्षेत्र 103 चौ. मी. व स. न. 74/1 ब / 1 क मधील प्लॉट नं. 12 क्षेत्र 75.60 चौ. मी. असे दोन भूखंड होते. ते त्यांनी 1987/88 मध्ये खरेदी केले होते. प्लॉट मालकांना अंधारात ठेवून अमोल अशोक मोरे व इरफान रऊफ पटेल यांनी जेबुनिसा शफी यांच्या नाव बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार केलीत. त्याद्वारे दोन्ही प्लॉटची खरेदी-विक्री करण्यात आली. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान घडला.
प्लॉटच्या व्यवहारासाठी जेबुनिसा शफी यांच्या नावाने धुळे सहा. दुय्यम उपनिबंधक कार्यालयात तोतया महिलेला उभे करण्यात आले. सदर फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर श्रीमती शफी यांचा मुलगा मोहम्मद शरीफ मोहम्मद शफी (52) यांनी धुळे पोलिसांकडे धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून एसपी श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना ताबडतोब कारवाईच्या सूचना केल्यात.
त्यानुसार एलसीबीने अमोल मोरे व इरफान रऊफ पटेल यांना अटक केली आहे. पोलिसांनी अमोल अशोक मोरे (रा. प्लॉट नं. 149, संतसेना नगर, देवपूर, धुळे, इरफान रऊफ पटेल, शेख अजीज शेख भिकारी, रा. ग.नं. 7, देवपूर, धुळे, बिलकीसबी सरूद्दीन शेख, रा. अंबिकानगर, देवपूर, धुळे, रईस शेख शरीफ शेख, रा. गौसिया मशिद ग. नं. 1, देवपूर, धुळे, रामचंद्र वामन अहिरे, रा. वरखेडे रोड, जुने धुळे, सुशील प्रेमचंद जैन, रा. अंचाळे तसेच आंबेडकर चौकात रहाणारी तोतया महिलेच्या विरूद्ध भादंवि कलम 419, 420, 467, 468, 469, 470, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई एसपी श्रीकांत धिवरे, एएसपी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, पीएसआय प्रकाश पाटील, एएसआय शाम निकम, पोहेकॉ. संदीप पाटील, पोहेकॉ. रवींद्र माळी, सुरेश भालेराव, पोना. रवीकिरण राठोड, पोकॉ. सुशील शेंडे, निलेश पोतदार, हर्षल चौधरी, गुणवंतराव पाटील यांनी केली.