चंदीगडचा आठ लाखांचा मद्यसाठा सांगवी पोलिसांनी पकडला
धुळे : खबऱ्याकडून मिळालेल्या टिपचा आधार घेत शिरपूर तालुका पोलिसांनी (सांगवी पोलीस स्टेशन) एक कंटेनर पकडला. त्यात आठ लाखांचा मद्यसाठा आढळून आला.
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमीदारांमार्फत टिप मिळाली होती. सेंधवाकडून शिरपूरकडे एक आयशर कंटेनरमध्ये दारु घेवून जात आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मंगला पवार पोलीस नाईक संदिप ठाकरे, काॅन्स्टेबल कृष्णा पावरा, चालक कॉन्स्टेबल संतोष पाटील, चालक कॉन्स्टेबल ईसरार फारुकी यांना दालनात बोलावून सदर वाहनाचा शोध घेणे कामी आदेशीत केल्याने सदर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पेट्रोलींग करीत वाहनाचा शोध घेत असताना आयशर वाहन (क्र. एन. एल. 01, ए.सी. 2876) ही हाडाखेड चेकपोस्ट जवळ मिळून आल्याने सदर वाहन हे चेक केले असता वाहनावरील चालक हा वाहन सोडून पळुन गेला. त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही.
सदर वाहनाचे कॅबीनची पाहणी केली असता त्यात एक मोबाईल मिळुन आला. त्यावर एक फोन येत होता. सदर मोबाईल फोन उचलुन विचारपुस केली असता वाहन मालक बोलत असल्याबाबत त्यांनी सांगीतल्याने वाहनाच्या मालकाला वाहनाला लावलेल्या सिल तोडुन वाहनाची झडती करावयाची असल्याबाबत कळविल्याने त्यांनी सिल तोडण्याची परवानगी दिली. वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी-विदेशी कंपनिची दारु मिळुन आली. सदरची दारु ही फक्त चंदिगड केंद्रशासीत प्रदेशमध्येच विकण्याची परवानगी आहे. सदरची दारु महाराष्ट्रात विकुन महाराष्ट्र शासनाचा कर बुडवुन शासनाची फसवणुक करीत आहे.
आठ लाखांचा मद्यसाठा जप्त : तीन लाख 16 हजार 800 रुपये किमतीची मॅकडॉल खंब्याचे एकुण 60 खोके, एक लाख 20 हजार रुपये किमतीची मॅकडॉल काॅटरचे एकुण 20 खोके, एक लाख 21 हजार 200 रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज खंब्याचे एकुण 20 खोके, दोन लाख 42 हजार 400 रुपये किमतीचे रॉयल स्टॅग खंब्याचेएकुण 40 खोके, 15 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 23 लाख 400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
यांच्या पथकाने केली कारवाई : ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय सुनील वसावे, महिला पीएसआय मंगला पवार, पोलीस नाईक संदिप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पावरा, चालक हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, चालक कॉन्स्टेबल ईसरार फारुकी यांनी केली.
याप्रकरणी पोलीस नाईक संदिप ठाकरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.