रोजगाराच्या अधिक संधींसाठी MKCL चे कोर्सेस आता नव्या रूपात
धुळे : बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या करीअर विषयी अपेक्षांमध्ये बदल झाले आहेत व याच येणाऱ्या बदलला समोर ठेऊन MKCL आता रोजगाराच्या सर्वोत्तम संधींसाठी MS-CIT सोबत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी व अधिक सक्षम करण्यासाठी संगणक ज्ञान देणारे विविध कोर्सेस देखिल चालवले जातात. यांना क्लिक् (KLiC) कोर्सेस असे म्हणले जाते, अशी माहिती एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक वीना काथम, उत्तर महाराष्ट्र समन्वय संतोष बिरारी यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली.
कौशल्य आणि कार्यबल विकास योग्यरित्या पूर्ण केल्यावर, कौशल्य विकासामुळे बेरोजगारी कमी होऊ शकते, उत्पादकता वाढू शकते आणि जीवनमान सुधारू शकते. भविष्यातील नोकऱ्यांसाठी लोकांना अपस्किलिंग किंवा रिस्किलिंगमध्ये गुंतवणूक केल्याने आर्थिक अर्थ प्राप्त होतो.या प्रकारचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची (YCMOU) मार्कशीट दिली जाते.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणाऱ्या आमूलाग्र बदलला समोर ठेऊन येणाऱ्या काळात शिक्षणात आता कौशल्य आणि कार्यबल विकास शिक्षणावर जास्तीत जास्त भर असणार आहे. राष्ट्रासमोर असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वपूर्ण संसाधन आहे. याचाच अर्थ जर राष्ट्रातील नागरिक सक्षम असतील तर ते राष्ट्र आव्हानांच रूपांतर संधीमध्ये करू शकत. त्यामुळे राष्ट्रातील नागरिक हे सक्षम बनवणे अत्यंत गरजेचं असतं. नागरिकांना सक्षम बनवण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण व या सर्व गोष्टींचा विचार करून व काळाची गरज म्हणून MKCL आता नवनवीन क्लिक् (KLiC) कोर्सेस विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिले आहेत.
नोकरी मिळवून देणारे क्लिक् कोर्सेस- क्लिक् इंग्लिश कम्युनिकेशन, क्लिक् टॅली विथ जीएसटी, अॅडव्हान्स्ड टॅली, अॅडव्हान्स्ड एक्सेल, ऑटोकॅड, ३डी मॉडेलिंग, ३डी टेक्श्चरिंग अँड लायटिंग, डिटीपी-कोरेल, डिटीपी-अॅडोबे, फोटोशॉप, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट इलस्ट्रेटर, व्हिडीओ एडिटिंग, सी प्रोग्रॅमिंग, सी++ प्रोग्रॅमिंग, कंप्यूटर हार्डवेअर सपोर्ट, नेटवर्क सपोर्ट, सिक्युरिटी सपोर्ट, डेस्कटॉप सपोर्ट, स्क्रॅच प्रोग्रॅमिंग, क्लिक् आयओटी ई. कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. पुढील महिन्यापासून रोबॉटिक्स्, सायबर सिक्युरिटी, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, रिटेल मॅनेजमेंट, BFSI या कोर्ससचे प्रशिक्षण देखील सुरू झाले आहे. वरीलपैकी कोणतेही तीन कोर्सस एकत्र केल्यावर क्लिक् डिप्लोमा असे अतिरीक्त प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुढील येता काळ हा युवापिढी ला प्रामुख्याने Professional Skills व Employability Skills च्या दृष्टीने फार महत्वाचा असणार आहे.
येणाऱ्या भविष्यकाळात संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व रोजगरक्षम युवा पिढी निर्माण व्हावी यासाठी MKCL ने Professional Skills व Employability Skills लागणारे नवनवीन ‘KLiC’ कोर्सेस व MS-CIT कोर्सचे प्रवेश हे महाराष्ट्रातील ४,५००+ केंद्रांवर, सुसज्ज कंप्यूटर लॅब आणि प्रशिक्षकांसोबत सुरू केलेले आहेत. अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या MS-CIT / KLiC केंद्राशी संपर्क साधावा असे आव्हान महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे म्हणजेच MKCL कडून करण्यात आले आहे.
MS-CIT आता नव्या स्किल्ससह
गेल्या दोन दशकांत तब्बल दीड कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्स केलेला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त भारतातील अनेक राज्यात देखील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा हा कोर्स चालवला जातो. MS-CIT हा एकच कोर्स पूर्ण करण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा एक जागतिक विक्रम आहे.
चौथी औद्योगिक क्रांती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक उलथापालथींची मालिका दर्शवते जी 21 व्या शतकात उलगडेल. चौथी औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात डिजिटल, जैविक आणि भौतिक नवकल्पनांच्या अभिसरणाने चालविली जाईल, त्यामुळे चौथी औद्योगिक क्रांती ही भविष्याची भविष्यवाणी नसून कृतीची मागणी आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अधिक सशक्त, सहयोगी आणि शाश्वत पाया वाढवणारे, मानवी सन्मान आणि इतर सामायिक मूल्यांभोवती बांधले गेलेले तंत्रज्ञान विकसित करणे, प्रसार करणे आणि नियंत्रित करणे ही एक दृष्टी आहे. ही दृष्टी साकारणे हे पुढील ५० वर्षांचे प्रमुख आव्हान आणि मोठी जबाबदारी असेल. या वरील सर्व गोष्टींचा विचार करून MKCL ने MS-CIT मध्ये देखील नवीन युगात वापरल्या जाणाऱ्या AI स्किल्सचा व इतर अनेक नवीन स्किल्स चा समावेश आता कोर्स मध्ये केला आहे.
कंप्यूटर, मोबाईल आणि इंटरनेट या तीनही गोष्टींचा योग्य वापर करून आपण ही सर्व कामे घरी बसूनदेखील करू शकतो. दैनंदिन जीवनातील अधिकाधिक गोष्टी सुकर करण्यासाठी कंप्यूटर, मोबाईल आणि इंटरनेट या तीनही गोष्टींची खूप मदत होत आहे. मात्र कंप्यूटर, मोबाईल आणि इंटरनेट या तीनही गोष्टीं घरात असून देखील प्रत्येकालाच त्यांचा प्रभावी वापर करून आपली दैनंदिन कामे करता येत नाहीत. त्यामुळेच MKCL ने प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी कंप्यूटर, मोबाईल आणि इंटरनेट वापरुन कशा प्रकारे करता येतील हे नवीन MS-CIT कोर्समध्ये शिकविले आहे. आपली दैनंदिन कामे कमीतकमी कष्टात आणि फारसे कुठे न जाता करता यावीत ही स्किल्स म्हणजेच 21st Century Daily Life Skills शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने नक्की शिकायला हवी.
वरिष्ठांना प्रेझेंटेशन करणे, विविध प्रकारचे अहवाल तयार करणे, ई मेल तपासणे व ई मेल करणे ही सर्व कामे कमीतकमी वेळेत व अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी जी स्किल्स लागतात ती नवीन MS-CIT कोर्समध्ये शिकायला मिळतात. कंप्यूटर वापरणाऱ्या प्रत्येकाची ही गरज ओळखून MKCL ने MS-CIT कोर्स मध्ये Smart Typing Skills चा देखील अंतर्भाव केला आहे. की-बोर्ड टायपिंगसोबतच आता मोठ्या प्रमाणात वॉइस टायपिंग केले जाते. कंप्यूटर आणि मोबाईलवर वॉइस टायपिंग करण्यासाठी गुगलची अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. या स्मार्ट टायपिंग सुविधेमुळे की-बोर्ड टायपिंगपेक्षा दुप्पट स्पीडने टायपिंग करता येते आणि आपला वेळ वाचवता येतो, अशी २०० हून अधिक स्किल्स MS-CIT कोर्समध्ये शिकवली जातात.