रावेर एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पात एक लाख तरुणांना मिळणार रोजगार : अनिल गोटे
धुळे : एमआयडीसीलगत रावेर (ता. धुळे) शिवारातील सरकारी भूखंडावर ट्रान्सपोर्ट हब उभारला जाणार आहे. या प्रकल्पात एक लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग हाेणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेला बोरविहिर-नरडाणा रेल्वेमार्ग हा मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा एक भाग असल्याचे सिध्द केल्यास आपण राजकारण साेडू, असेही आव्हानही त्यांनी दिले.
अनिल गोटे म्हणाले की, जिल्ह्यातील बेराेजगारीचा प्रश्न साेडविण्यासाठी रावेर येथील एमआयडीसी फेज टू च्या जागेचा प्रश्न साेडविण्यात आला. त्याठिकाणी माेठा उद्याेग आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी याठिकाणी ट्राॅन्सपाेर्ट, ड्रायपाेर्ट हब उभारणीची तयारी दाखविली आहे. त्यासाठी राज्याच्या उद्याेग विभागाकडून प्रस्ताव द्यावा, असे सांगितले आहे. त्यानुसार उद्योगमंत्री उदय सावंत यांनी पुढील आठवड्यात ना हरकत प्रमाणपत्र देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एक लाख राेजगार उपलब्ध हाेणार आहे.
जिल्ह्यात माेठे औद्याेगिक प्रकल्प आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अपूर्ण पडली. त्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला नाही. त्यात रावेर येथील एमआयडीसीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित हाेता. विकासासाठी आपण मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी आंदाेलन केले. मात्र त्यात खाेडा घालण्यात आला. तरीही आपण नितीन गडकरी यांची भेट घेवून प्रकल्पासाठी प्रयत्न केले. त्यांनी एक लाख राेजगार उपलब्ध हाेवू शकतील अशा प्रकल्पाला मान्यता दिली. त्यासाठी राज्याच्या उद्याेग मंत्र्यांशी र्चचा करून त्यांना याबाबत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पुढील आठवड्यात केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे राज्याचे उद्योगमंत्री सावंत यांनी सांगितले असल्याचे गाेटे यांनी सांगितले. याठिकाणी ट्रान्सपाेर्ट व ड्रायपाेर्ट व अन्य व्यवसाय सुरू करण्यास अनुकुलता दर्शविली आहे. त्यासाठी हा भुखंड राज्य सरकारने केंद्र सरकारच्या रस्ते विकास व वाहतूक विभागाकडे हस्तांतरीत करण्याची अट आहे. त्यानुसार हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इकबाल मिरचीकडून भाजपाला २० काेटी : नवाब मलिक यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, इकबाल मिरचीकडून २०१४-१५, २०१७-१८ मध्ये भाजपाला २० काेटी दिले असल्याचे सांगितले. ही माहिती निवडणूक आयाेगाकडून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच डीएमआयसीचा बेस हा मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग हाेता. परंतु चारवेळा सर्व्हे करीत त्यात खाेड घातला गेल्याने हा मार्ग आता हाेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.