लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिरात 540 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
धुळे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार किसनराव माणिकराव खोपडे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात धुळे शहरासह जिल्ह्यातील 540 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकमान्य हॉस्पिटलचे प्रसिद्ध सर्जन डॉ. संजय किसनराव खोपडे आणि डॉ. बिंदू संजय खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी आणि उपचार करीत आहे.
दिवंगत माजी आमदार किसनराव माणिकराव खोपडे यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या दिवशी रविवारी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. लोकमान्य हाॅस्पीटल येथे 10 डिसेंबर रोजी पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी खोपडे परिवारातील विनायकराव खोपडे, अशोकराव खोपडे, अण्णा खोपडे, सुभाषराव खोपडे, प्रकाशराव खोपडे, अमितराव खोपडे, निलेशराव खोपडे, मयूरराव खोपडे, पवनराव खोपडे, आबा खोपडे, निखिलराव खोपडे, श्याम खोपडे अणि त्यांच्या कुटूंबातील नातेवाईकांनी किसनराव खोपडे यांना आदरांजली वाहिली.
तसेच माजी आमदार कै. किसनराव खोपडे यांच्यावर प्रेम करणारे प्रामुख्याने माझी मंत्री रोहिदासदाजी पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, जिवन शेंडगे, न्हानू परदेशी, विजय सोनार (पिलखोडकर), विनायक शिंदे, आकाश शिंदे, रावसाहेब कदम, मुकुंद कोळवले यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी दिवंगत खोपडे भाऊंच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.
यावेळी समाजाचे अध्यक्ष संजय शेंडे, पांडुरंग घाटोळे, संजय अंपळकर, पांडुरंग घाटोळे, ईश्वर लाडे, भगवान अंपळकर, संजय अंपळकर, मोहन चित्ते, बडगुजर सर, राजाभाऊ वाणी, मुंडके आप्पा, किशोर कुलथे, नितीन कलाल, सतीश खोंडे, शेखर सोनार, सलीम पिंजारी तसेच नातेवाईक, व्याही, संबंधित आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकारी शोकाकुल उपस्थित होते.
स्व. किसनराव खोपडे यांचे जेष्ठ सुपूत्र डॉ. संजय खोपडे यांनी सांगितल़े की, वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त २६ नोव्हेंबरपासून वैद्यकीय शिबिर घेण्यात येत आहे. त्यामध्ये मागील 20 दिवसात आतापर्यंत अंदाजे 540 पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांनी व त्यांची पत्नी डॉ. बिंदू संजय खोपडे यांनी व हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी मिळून रूग्ण तपासले. तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. तपासलेल्या रुग्णांना रक्त लघवीच्या व इतर तपासण्यात मोठी सूट त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच शासनाच्या कोविड काळाच्या धोरणाशी संलग्न होऊन आपत्तीच्या काळामध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 120 तरुण-तरूणींना कोरोना वॉरियर्स म्हणून नर्सिंगचे प्रशिक्षण त्यांनी दिले. ते उत्तीर्ण झाले असून, शासनाकडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्याचे देखील वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते आले.
तसेच चालु शैक्षणिक वर्षापासून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये जी.एन.एम. या नर्सिंग प्रशिक्षणाची सुरुवात झालेली आहे, असे त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर शक्ती व क्षमतेप्रमाणे चालत राहू असेही ते म्हणाले.
No.1 Maharashtra