महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कर्मचारी संपावर
धुळे : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्र कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून संपावर आहेत. कामाच्या तुलनेत वेतन कमी असल्याने वेतनवाढ द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय न घेता बाहेर जिल्ह्यातील कर्मचारी आणून लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कंपनीने केला. दरम्यान, आरोग्य मित्रांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाची ताकद लावली आहे. वेतनवाढ दिली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आरोग्य मित्रांनी दिला आहे.
तुटपुंज्या वेतनमुळे आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे वेतनवाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी आरोग्यमित्रांनी शहरातील क्युमाईन क्लबजवळ बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले. महात फुले जनआरोग्य योजनेत 2012 पासून आरोग्य मित्र म्हणून कार्यरत आहेत. तसेच 2018 पासून अतिरिक्त प्रधानमत्री जन आरोग्य योजना विनावेतन सेवा बजावत आहेत. आरोग्यमित्रांचे वेतन 25 हजारांपर्यंत करण्यात यावे, यासाठी वारंवार अर्ज देऊन देखील कोणतीही लेखी हमी मिळालेली नाही. गेल्या 11 वर्षांपासून योजनांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे अखंड रुग्णसेवा आरोग्य मित्र करीत आहेत. पगारवाढ 25 हजार रुपये मासिक करण्यात यावी, या मागणीकरिता आरोग्य मित्रांनी कामबंद
आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या पदााधिकार्यांनी आंदोलनस्थळी जावून पाठींबा दिला. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील दिले.
यावेळी भाजपच्या नेत्या मायादेवी परदेशी, बेटी पढाव, बेटी बचाव अभियानाच्या प्रमुख अल्पा अग्रवाल, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, नगरसेविका वंदना भामरे, माजी उपमहापौर भगवान गवळी, विजय जाधव, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, दिनेश बागुल, सजन चौधरी, मयुर सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनात पंकज अहिरे, किरण ढमढेरे, अरुण ढिवरे, सागर महाजन, विनोद निकम, संदीप माळी, मनोज भदाणे, राजेंद्र लिंगायत, सौरभ मराठे, भूषण चौधरी, रितेश चौधरी, भाग्यश्री पाटील, सुनीता पाटील, रोहिणी भावसार, वसुंधरा चित्ते आदी आंदोलनात सहभागी आहेत.