भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ
धुळे : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या कुटुंबीयांनी मोफत उपलब्ध करून दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या जागेवर भाजपच्या हायटेक कार्यालयाच्या बांधकामाला बुधवारपासून सुरूवात झाली. येत्या आठ महिन्यात कार्यालयाचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केला.
भाजप कार्यालय निर्माण आघाडीचे प्रदेश संघटन मंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते, भाजपच्या नूतन कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ मारुती नगर चाळीसगाव रोड, येथे 13 डिसेंबर रोजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला हवेहवेसे वाटणारे कार्यालय प्रत्यक्ष साकारत असल्याचे पाहून सर्वजण भारावले होते. धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर व ज्येष्ठ बंधू सतीश अंपळकर यांच्या परिवाराने दिलेल्या योगदानानुसार सुमारे पाच कोटी रुपयांच्या जागेवर या भव्य कार्यालयाचे निर्माण होत आहे.
कार्यालयाच्या बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी धुळे मनपा महापौर प्रतिभाताई चौधरी, ज्येष्ठ नेते लखन भतवाल, मदनलाल मिश्रा, भीमसिंह राजपूत, रवी बेलपाठक, विजय पाच्छपूरकर, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जितेंद्र चौटीया, ओमप्रकाश खंडेलवाल, संदीप बैसाणे, भारतीताई माळी, यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, डॉ. माधुरी बाफना, उपाध्यक्ष संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, ॲड. किशोर जाधव, मनोज शिरोळे, भगवान देवरे, गुलशन उदासी, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाठ, केदार मोरणकर, अनिल थोरात, अनिल दीक्षित, योगेश मुकुंदे, मनीषा ठाकूर, नगरसेविका वंदना भामरे, रंगनाथ ठाकरे, नंदू सोनार, अनिल नागमोते, नागसेन बोरसे, भगवान गवळी, आरती पवार, सुनील बैसाणे, कशिश उदासी, हर्षकुमार रेलन, विजय जाधव, भिकन वराडे, वंदना थोरात, कल्याणीताई अंपळकर, बन्सीलाल जाधव, योगिता बागुल, प्रशांत बागुल, दगडू बागुल, शशी मोगलाईकर, चिटणीस प्रथमेश गांधी, गीता कटारिया, निशा चौबे, मुन्ना शितोळे, तुषार भागवत, सतीश बागुल, प्रभाकर पाटील, प्रकाश उबाळे, राम अग्रवाल, जीवन शेंडगे, अनिल सोनार, पंकज अग्रवाल, विवेक कुलकर्णी, स्वप्नील लोकरे, नंदू ठोंबरे, श्रीराम भतवाल, उल्हास पाटील, भागवत चीतळकर, विजय पवार, उमेश जैन, पापा मगरे, शिवाजीराव काकडे, विनोद खेमनार, मतीन खाटीक, रमेश करनकाळ, पवन जाजु, योगेश सोनजे, अशोक विष्णू गाढवे, मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील, अरुण पवार, भिलेश खेडकर, ईश्वर पाटील, योगेश पाटील, पंकज धात्राक, नरेश गवळी, नरेश हिरे, सुहास अंपळकर, पंडित मदने, मोहिनी धात्राक, संगीता राजपूत, नेहा अहिरराव, मीनल अग्रवाल, राहुल गावडे, संतोष खंडेलवाल, योगेश वाणी, इकबाल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा