अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यावर आ. कुणाल पाटील यांनी उठविला आवाज
धुळे : जिल्हयासह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदनीस आपल्या न्याय्य मागण्यासाठी वारंवार आंदोलन करतात, मात्र सरकार अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये असंतोष आहे. म्हणून सरकारने तत्काळ अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बाल वयातील शिक्षण आणि आरोग्याचा पाया म्हणून अंणवाडी आणि तेथील कर्मचार्यांकडे पाहिले जाते. मात्र त्याच कर्मचार्यांना आपल्या मागण्यांसाठी लढावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.
नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न क्र. (13)71708 नुसार अंगणवाडी कर्मचार्यांचे प्रश्न मांडतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन कमी असून तेही वेळेत मिळत नाही. अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देऊन त्यानुसार वेतनश्रेणी, महागाई भत्ता, रजा व इतर भत्ते देण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी कर्मचार्यांनी अनेक वेळा धरणे आंदोलने केले. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शासनाने तत्काळ अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली आहे.
हेही वाचा