शिरपूर तालुका पोलिसांनी 42 लाखांचा गुटखा पकडला
धुळे : मध्यप्रदेशातून मुंबईकडे जाणारा एक मोठा कंटेनर पकडून शिरपूर तालुका पोलिसांनी (सांगवी) सुमारे 42 लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा पकडला. पोलिसांना टिप मिळाल्यानंतर गुरूवारी रात्री हाडाखेड आरटीओ चेकपोस्टनजीक हि कारवाई करण्यात आली.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्टवर सांगवी ता. शिरपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ आणि त्यांच्या पथकाने सुमारे 42 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि कंटेनरसह जप्त केला. याप्रकरणी हरियानाच्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी एपीआय शिरसाठ यांच्यासह पथकाच्या कामगिरीचे विशेष कौतूक केले. मध्यप्रदेशातून शिरपूूरमार्गे कंटेनरमधून सनकी आणि रॉयल नावाच्या राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक धिवरे यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार हाडाखेड आरटीओ चेकपोस्टजवळ एच. आर. ५५ एक्स. ६९१३ क्रमांकाच्या कंटेनरला थांबविले. कंटेनर चालकाची चौकशी सुरु केली. चालकाने त्याचे नाव अजीज शरीफ (वय ४०, रा. अंजनपूर ता. फिरोजपूर जि. नुहु, हरियाणा) असे सांगितले. कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला मिळुन आला.
एकूण 62 लाखांचा मुद्देमाल जप्त : २९ लाख ९५ हजार २०० रूपये किंमतीचा रॉयल १००० नावाचा गुटखा, १२ लाख ४४ हजार ८८० रुपये किंमतीचा एसएनके (सनकी) नावाचा गुटखा व २० लाखांचा कंटेनर असा एकुण ६२ लाख ४० हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी अन्न प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना बोलविण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई : ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, कॉन्स्टेबल योगेश मोरे, संजय भोई, रामदास पावरा, अलताफ मिर्झा यांच्या पथकाने केली.
हेही वाचा