पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे
धुळे : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खान्देश मैदानचे संपादक मनोज उत्तमराव गर्दे तर उपाध्यक्षपदी दै. श्रमराज्यचे संपादक अतुल मनोहर पाटील, ग्रामिण उपाध्यक्षपदी अरुण सुकलाल धोबी यांची तर सरचिटणीपदी सचिन सुरेश बागुल, कोषाध्यक्षपदी तुषार दगडूलाला बाफना, प्रांतिक प्रतिनिधी म्हणून प्रकाश दगा शिरसाठ यांची निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद बैसाणे यांनी पत्रकार संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारणीची निवड झाल्याची घोषणा केल्यानंतर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशांचा गजर झाला. तर गुुलालाची मुक्त उधळण झाली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकुर, देविदास माळी होते. तर माजी अध्यक्ष रविंद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, ओम शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष मनोज उत्तमराव गर्दे, उपाध्यक्ष शहर अतुल मनोहर पाटील, उपाध्यक्ष ग्रामिण अरुण सुकलाल धोबी, सरचिटणीस सचिन सुरेश बागुल, कोषाध्यक्ष तुषार दगडूलाल बाफना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश दगा शिरसाठ, कार्यकारणी सदस्य मोहन चिंतामन मोरे, पुरुषोत्तम नानाजी पाटील, मनोहर रघुनाथ सोलंकी, राजेंद्र मधुकर भावसार, रविंद्र भिमराव नगराळे, राकेश दत्तात्रय गाळणकर, संतोष सदाशिव ताडे, रेखचंद भवरलाल जैन, दीपक अरुण शिंदे, आकाश सुरेश सोनवणे, जमिल अहमद युसुफ शाह, स्विकृत सदस्य म्हणून अशोक सुदाम तोटे, पंकज ज्ञानेश्वर पाटील, वाल्मीक विनायक पाटील, आवेश मोहम्मद खान, प्रदीप लोटनसिंग राजपुत, अजिंक्य देवरे यांची निवड झाल्याचे घोेषीत करण्यात आले.