तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 230 शाळांचा सहभाग
धुळे : पंचायत समिती शिक्षण विभाग, धुळे तालुका मुख्याध्यापक संघ तसेच गणित अध्यापक संघ व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित, श्री. छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय, मोराणे प्र. नेर यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे भव्य तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आज(दि.१९) संपन्न झाले. मोराणे येथील सैनिकी विद्यालयात, अतिशय दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनात धुळे तालुक्यातील १४० तर शहरातील ९० अशा एकुण २३० विद्यालयांनी सहभाग घेतला.
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित, श्री. छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय, मोराणे प्र. नेर येथे झालेल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे हे होते. तर उद्घाटक म्हणून धुळे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, होते. प्रमुख पाहुणे म्हणुन धुळे शिक्षणाधिकारी मोहन देसले, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या सचिव तथा जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे, पंचायत समितीचे उपसभापती देवेन्द्र माळी, धुळे जि. प. चे माध्यमिक उप शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील व माध्यमिक उप शिक्षणाधिकारी तथा विज्ञान पर्यवेक्षक एस. ई. बागुल, गट शिक्षाणधिकारी सुरेखा देवरे, विज्ञान प्रदर्शन सचिव संजीव पी. विभांडिक, धुळे मनपा प्रशासन अधिकारी एम. जे. सोनवणे, धुळे शहर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष संजीव एच. पाटील, धुळे तालुका उख्याध्यापक संघ अध्यक्ष आर. जे.पाटील, धुळे शहर गणित व विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष प्रविणकुमार लाडे, सचिव हर्षल जे. पवार, धुळे ग्रामीण गणित व विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष राजीव पटेल, सचिव डि. पी. पाटील, आदी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात धुळे तालुका व धुळे शहरातल्या सर्व शाळांमधून २३० स्पर्धक सहभागी झाले. विज्ञान प्रदर्शनात इ.६ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी, उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी आणि शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक निर्मित साहित्य मांडण्यात आलेले होते. विज्ञान प्रदर्शनात मार्गदर्शन करतांना धुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञानाचे महत्व काय तसेच आपल्या भारतीय राज्यघटनेत विद्याथी विज्ञाननिष्ठ होण्यासाठी विज्ञानाचे महत्त्व विषद केले. यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्हातले त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना कथीत करुन प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी देशाचा भावी नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या जडणघडणीत विज्ञान प्रदर्शनाचा कसा फायदा होतो हे सांगितले.
या विज्ञान प्रदर्शनाचे प्रास्ताविक धुळे पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बेहेरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. बी. बोरकुंडकर यांनी तर आभार प्रदर्शन सैनिकी विद्यालयाचे उपप्राचार्य के. के. बाविस्कर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहर गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार लाडे व ग्रामीणचे अध्यक्ष राजीव पटेल, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बेहेरे, उपप्राचार्य के. के. बाविस्कर, पर्यवेक्षक एस. बी. गरुड तसेच सर्व विज्ञान शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.