दुष्काळाचे टंचाई अनुदान तत्काळ द्यावे : आ. कुणाल पाटील
धुळे : जिल्हयासह तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून महाराष्ट्र सरकारने दुष्काळातील टंचाई अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावे, तसेच शंभर टक्के शेतकर्यांना पिक विमा अग्रीम रक्कम द्यावी, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, पिक विमा कंपन्या किती शेतकर्यांना विमा रक्कम देतात याचा ताळेबंद अहवाल शासनाने सादर करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी सोमवार 18 सप्टेंबर रोजी धुळे तालुक्यासह जिल्हयातील दुष्काळात होरपळणार्या शेतकर्यांचे प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीतून मांडले. यावेळी विधानसभेत झालेल्या लक्षवेधीच्या चर्चेत बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. मात्र धुळे जिल्हयात दुष्काळाची भीषणता तीव्र असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळामुळे खरीप हंगाम हातचा गेला, त्यानंतर लगेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचे पूर्णपणे नुकसान झाले. शासनाने एक रुपयात काढून दिलेला पिक विमा शेतकर्यांना फुकट काढून दिला हे म्हणने योग्य नाही कारण हा एक रुपया जनतेच्या करातूनच भरला जातो. मात्र अद्यापही शंभर शेतकर्यांना पिक विम्याची अग्रीम रक्कम मिळाली नाही. म्हणून शेतकर्यांना तत्काळ पिक विमा रक्कम मिळावी. कृषी विभागाने 65 टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिला आणि पिक विमा कंपन्या फक्त 53 टक्केच नुकसान झाल्याचे दाखवीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांची दिशाभूल होत आहे. म्हणून पिक विमा कंपन्यांचे ताळेबंद तपासून त्यांची विशेष तपास पथक नेमून चौकशी व्हावी आणि त्याचा अहवान सादर करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी यावेळी केली.
सभागृहात बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी विशेष लक्ष वेधून बोलतांना सांगितले कि, सरकारने जाहिर केल्याप्रमाणे दुष्काळातील टंचाई अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावे. तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी, गारपीटीतील नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, अशीही मागणी केली.