एमआयडीसीसाठी हरण्यामाळ पाणी योजना कार्यान्वित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश
धुळे : औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी रावेर शिवारातील जमीन अधिग्रहित करणे आणि औद्योगिक वसाहतीस नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्यादृष्टीने हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वयीत करणेबाबत हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत आ. फारुख शाह यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी संबंधित अधिका-यांची बैठक आपल्या दालनात आयोजित केली होती.या बैठकीत रावेर शिवारातील जमीन अधिग्रहित करणे आणि औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी रावेर शिवारातील जमीन अधिग्रहित करणे संदर्भात तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत
धुळे शहरात मोठे उदयोग धंदे नसल्याने तसेच धुळे शहरातील महामार्गालगत असलेल्या M.I.D.C. ची जागा अपूर्ण पडत असून त्यासाठी शासनाने रावेर शिवारातील जागेची निवड केली होती. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कासव गतीच्या कामामुळे हे काम रेंगाळलेले आहे. धुळे शहरात बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. रावेर शिवारातील ९८ एकर जागेवर M.I.D.C. झाल्यास धुळे शहरातील १० हजार ते १५ हजार युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण घटून धुळे शहरातील युवकांच्या हाताला काम मिळेल व महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल. रावेर शिवारातील ९८ एकर जमिनीचे १९८० च्या अगोदर निर्वनीकरण झाले असल्याने महसूल विभागाने मोजणी करून जमीन ताब्यात घ्यावी असे निर्देश ना.उदय सामंतांनी दिले तसेच धुळे औद्योगिक वसाहतीस सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वयीत व्हावी यादृष्टीने प्रशासनिक अडचणी सोडविणे गरजेचे आहे.वन विभागाची परवानगी आणि हरण्यामाळ मध्यम प्रकल्पातील पाण्यावर आरक्षण टाकण्याची कार्यवाही तत्काळ करून हरण्यामाळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा प्रसिद्ध करावी असे आदेश उद्योग मंत्री ना.उद्या सामंत यांनी दिले.
रावेर शिवारातील जमीन अधिग्रहित करणे आणि औद्योगिक वसाहतीस नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्यादृष्टीने हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वयीत करण्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे धुळेकर नागरिक आणि उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे.धुळे औद्योगिक वसाहतीचा महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्यामुळे आ.फारुख शाह यांनी उद्योग मंत्री ना.उद्या सामंत यांचे आभार मानले आहे.या बैठकीस उद्योग म.औ.वि.महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,मुख्य अभियंता राजेंद्र गावडे,कार्यकारी अभियंता सुधाकर गांधीले,अतिरिक्त जिल्हाधिकारी केकान आणि जलसंपदा विभाग मध्यम प्रकल्प धुळे चे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.