मंत्री रामदास आठवले यांच्या नावाने शिवभोजन केंद्र
धुळे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावाने धुळे शहरात शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे. आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर रोजी या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
नानाभाई साळवे, मनोज मोरे, अतुल पाटील यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचा शुभारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिवसेनेचे पदाधिकारी शेखर वाघ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवभोजन केंद्राचा पत्ता असा : प्लॉट क्रमांक एक, विखेनगर, शेलारवाडी, चितोड नाक्याजवळ, मिल परिसर, धुळे या पत्त्यावर शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे.
केंद्राला आठवले दांपत्याचे नाव : ‘श्री व सौ सीमाताई रामदास आठवले शिवभोजन केंद्र’ असे या केंद्राचे नाव आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्ह्याच्या महिला आघाडी कार्याध्यक्षा बुद्धप्रिया धोंडीराम पगारे, निलेश गोविंद काटे आणि लीना निलेश काटे यांनी हे शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. गरीब आणि गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.