धुळे ग्रामीणमध्ये तब्बल एक लाख कॅलेंडर मोफत वाटप करणार : राम भदाणे
धुळे : भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभेचे निवडणूक तथा जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतू अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाणतर्फे संपूर्ण मतदार संघात एक लाखाहून अधिक कॅलेंडर वाटप करण्यात येणार आहेत.
अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाणच्या माध्यमातून धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सेवाभावी उपक्रम गेल्या 10 वर्षापासून जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहेत. मागील वर्षापासून तालुक्यात घरोघरी दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षी देखिल सन 2024 च्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते 27 डिसेंबर रोजी करण्यात आले आले. याप्रसंगी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, माजी केंद्रीय राज्यमंत्रेी खा. डॉ. सुभाष भामरे, शिंदखेडा विधानसभेचे आमदार जयकुमार रावल, धुळे महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभाताई चौधरी, भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभेचे निवडणूक तथा जि. प. सदस्य राम भदाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राम भदाणे यांच्या संकल्पनेतू अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाणतर्फे संपूर्ण मतदार संघात एक लाखाहून अधिक कॅलेंडर वाटप करण्यात येणार आहेत. सदर कॅलेंडर प्रकाशन ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गिरीष महाजन यांनी धुळे ग्रामीण मतदार संघात सुरु असलेल्या गोर-गरीब, सर्वसामान्य जनतेसाठी जे सामाजिक उपक्रम सुरु आहेत त्याबद्दल युवा नेते जि. प. सदस्य राम भदाणे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्यात.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवर भाजपाचे महामंत्री चौधरी, खा. डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभाताई चौधरी आदींनी राम भदाणे यांचे सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करत अभिनंदन केले.
यावेळी राम भदाणे आभार व्यक्त करतांना म्हणाले, धुळे ग्रामीण मतदार संघात अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठाणतर्फे सर्वसामान्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा निश्चितचन सर्वसामान्य जनतेला लाभ मिळत असतो. आधी समाजकारण मग राजकारण यापद्धतीने माजी आमदार कै. अण्णासाहेब यांना अभिप्रेत असलेले काम मला धुळे ग्रामीण मतदार संघात करावयाचे आहे असे यावेळी बोलतांना म्हटले.
हेही वाचा
अक्कलपाडा प्रकल्प भाजपनेच पूर्ण केला! पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दावा