चिकसे गावात प्रहार जनशक्ती संघटनेची शाखा सुरू
साक्री : तालुक्यातील चिकसे गावात प्रहार जनशक्ती दिव्यांग संघटनेची शाखा नुकतीच स्थापन करण्यात आली. शाखाप्रमुख म्हणून योगेश काळे तर उपप्रमुख म्हणून देविदास अहिरे काम करणार आहेत.
प्रहार संघटनेच्या शाखेचे फलक अनावरणही समारंभपूर्वक करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच वंदनाताई सुरेश खैरनार होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष जयेश बुवा, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, शशिकांत अहिरराव, पत्रकार जगदीश अहिरराव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला दिव्यांग बंधू-भगिनी देखील उपस्थित होत्या.