जवाहर फाउंडेशन येथे अत्याधुनिक उपकरणाचे उद्घाटन
धुळे : जवाहर मेडीकल फाउंडेशनचे ए. सी. पी. एम. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुसज्ज अशा ऑडीयॉलॉजी व व्हेस्टिव्यूलर लॅबचे उद्घाटन करण्यात आले. कान-नाक घसा विभागात अत्याधुनिक उपकरण असलेली उत्तर महाराष्ट्रातील ही एकमेव लॅब आहे.
या लॅबचे उद्घाटन माजी मंत्री रोहिदास पाटील आणि श्रीमती पुष्पाताई भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आले. जवाहर मेडीकल फाउंडेशनचे अध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या संकल्पनेतून ह्या अत्याधुनिक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी कान-नाक-घसा तज्ञ डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. चारुहास जगताप, डॉ. अदित्य जैन यांनी परिश्रम घेतले आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. ममता पाटील, डॉ. शैलेंद्र पाटील, नेहल पाटील, सहसचिव संगिता पाटील, अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी, डॉ. दिलीप पाटील, डॉ. एन. व्ही. द्रविड, डॉ. मृदुला द्रविड, डॉ. ए. डब्ल्यू पाटील, डॉ. अलका पाटील, डॉ. मंजुळाबाई, डॉ. सुरेंद्र वडगावकर, डॉ. वाय. जे. महाले, डॉ. मनोज कोल्हे, डॉ. रोहण कुलकर्णी, डॉ. निर्मलकुमार चौधरी, डॉ. आरती कर्णिक, डॉ. करुणा अहिरे यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.