धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी धरती देवरे बिनविरोध
धुळे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सदस्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली.
माजी अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी धरती देवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित आहे. त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी करतील.
धरती देवरे या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सुनबाई आहेत. तर गुजरातच्या नवसारी मतदार संघातील खासदार सी. आर. पाटील यांच्या सुकन्या आहेत. खासदार सी. आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.