अक्कलपाडा कालव्यातून पाणी सोडा, आ. कुणाल पाटील यांची मागणी
धुळे : शेतकर्यांच्या रब्बी हंगामासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान या मागणीचे आ.पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना पत्रही दिले आहे.
धुळे जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. विहीरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडावे अशी मागणी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना दिलेल्या पत्रात आ.कुणाल पाटील यांनी म्हटले आहे कि, दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. पाऊसच न आल्याने धुळे तालुक्यातील नदी-नाले, पाझरतलाव कोरडे ठाक पडले आहेत. परिणामी जमीनीची पाण्याची पातळी खालावली असून सिंचन विहीरी,कुपनलिकांनी तळ गाठला आहे. तसेच काही विहीरी पूर्णपणे आटल्या आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना गहू,हरभरा,कांदा,भूईमूग,दादर,ज्