हट्टी खु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृष्णा खांडेकर
धुळे : हट्टी खु. (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृष्णा भगवान खांडेकर यांची बिनविरोध नि निवड झाली. हट्टी खु. गावाच्या इतिहासात कृष्णा खांडेकर हे सर्वात तरुण सरपंच म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
हट्टी खु. ता. साक्री येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाची नुकतीच निवड करण्यात आली. रुपाली पदमोर यांचा सरपंच पदाचा नियोजित कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नवीन सरपंचपदाची नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच हट्टी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकित कृष्णा भगवान खांडेकर यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच रुपाली पदमोर, विद्यमान उपसरपंच केवळबाई दादा खांडेकर, माजी उपसरपंच भगवान गोविंदा मासुळे, फुला थोरात, अनिता नरोटे, म्हाळसाबाई शिंदे, मथुराबाई पदमोर, संतोष पदमोर, कैलास सोनवणे, मिराबाई संतोष मासुळे, दिपक पाटील, जरुर ठाकरे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी वैशाली आंधळे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामसेवक डी. जी. सुर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. ज्येष्ठ नेते वेडू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त सरपंच कृष्णा खांडेकर यांचे गटनेते माजी पं. स. सदस्य त्र्यंबक पदमोर, साईनाथ विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन किरण पदमोर यांनी सत्कार केला.