नॉर्थ पॉईंट स्कूलच्या 5 माजी विद्यार्थ्यांचे चार्टर्ड अकाउंटंट परिक्षेत यश
धुळे : येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या नॉर्थ पॉईंट स्कूलच्या तब्बल पाच माजी विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउन्टट ऑफ इंडियाच्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळविले आहे. चार्टर्ड अकाउन्टटस परिक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाल्याने संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. संपूर्ण भारतभरातून चार्टर्ड अकाउन्टट ऑफ इंडियाच्या परिक्षेचा एकूण निकाल 9.42 टक्के एवढाच लागला असून अत्यंत कठीण समजल्या जाणार्या या परिक्षेत नॉर्थ पॉईंट स्कूल धुळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे ऐतिहासिक आहे.
चार्टर्ड अकाउन्टटस नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच घोषीत करण्यात आला. या परिक्षेत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था संचलित नॉर्थ पॉईंट स्कूल देवपूर धुळेचे तब्बल 5 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. आयसीएसई बोर्डाच्या नॉर्थ पॉईंट स्कूल देवपूर धुळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये घवघवीत यश संपादन करुन संस्थेचा नावलौकीक वाढविला आहे. वैद्यकीय,अभियांत्रिकी,अकाउन् टटस अशा विविध विभागात माजी विद्यार्थी यशस्वीपणे पुढे जात आहेत.
चार्टर्ड अकाउन्टटस नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच घोषीत करण्यात आला. या परिक्षेत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था संचलित नॉर्थ पॉईंट स्कूल देवपूर धुळेचे तब्बल 5 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. आयसीएसई बोर्डाच्या नॉर्थ पॉईंट स्कूल देवपूर धुळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये घवघवीत यश संपादन करुन संस्थेचा नावलौकीक वाढविला आहे. वैद्यकीय,अभियांत्रिकी,अकाउन्
नॉर्थ पॉईंट स्कूलची यशस्वी परंपरा : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या नॉर्थ पॉईट स्कूल, धुळेने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. गेल्या वीस वर्षापासून आयआयटी,एमबीबीएस,बी.टेक,एम.टेक अशा उच्च शिक्षणात येथील माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भरारी घेतली आहे. आय.सी.एस.ई.बोर्डचा शैक्षणिक अभ्यासक्रम असल्यामुळे विविध स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो.
नॉर्थ पॉईंट स्कूल देवपूर धुळेच्या सन 2016-17 मधील इयत्ता 10 वीतील 5 माजी विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउन्टटसच्या परिक्षेत दैदिप्यमान यश मिळविले आहे. त्यात कृष्णा सचिन माहेश्वरी, कृष्णकांत विष्णुकांत फाफट, प्रथम परेश शाह, श्रावणी दिलीप पाखले, शुभम राजेश सुराणा हे विद्यार्थी चार्टर्ड अकाउन्टटससाठी नोव्हेंबर 2023 झालेल्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण होऊन त्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतभरातून चार्टर्ड अकाउन्टट ऑफ इंडियाच्या परिक्षेचा एकूण निकाल 9.42 टक्के एवढाच लागला असून अत्यंत कठीण समजल्या जाणार्या या परिक्षेत नॉर्थ पॉईंट स्कूल धुळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे ऐतिहासिक आहे.

त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आ. कुणाल पाटील, अश्विनीताई कुणाल पाटील, प्राचार्या जे. आर. नेल्सन यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.