निमगुळ पुलाचे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
धुळे : ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर करण्यात आलेल्या निमगुळ पुलाचे लोकार्पण तसेच शिरुड ते निमगुळ-बाबरे रस्ता आणि नंदाळे खु.भिरडाणे ते चिंचखेडा-बाबरे रस्त्याचे भूमीपुजन आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आ.पाटील यांनी मंजुर केलेल्या अशा एकूण 23 कोटी 63 लक्ष रुपये कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन झाले. या कामांमुळे बोरी पट्ट्यातील शेतकरी व नागरीकांची प्रवासाची गैरसोय दूर होणार आहे.
धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपुजन दि.14 जानेवारी 2024 रोजी आ.पाटील यांच्या हस्ते पार पडले. धुळे तालुक्यातील निमगुळ आणि चिंचखेडा येथे धुळे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भूमीपुजन सोहळा पाटील पडला. आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बोरी नदीवर निमगुळ आणि नवे निमगुळ गावासाठी मोठ्या पुलाचे काम मंजुर करण्यात आले होते. या पुलाच्या कामासाठी आ.कुणाल पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 4 कोटी 50 लक्ष रुपयाचा निधी मंजुर करुन आणला होता. ह्या पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने त्याचे आ.पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तर आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शिरुड ते धामणगाव वणी ते निमगुळ-बाबरे रस्त्याच्या कामासाठी एकूण 7 कोटी 30 लक्ष 79 हजार रुपयाचा निधी मंजुर करुन आणला आहे. त्याचप्रमाणे नंदाळे खु. भिरडाणे ते चिंचखेडा बाबरे रस्त्याच्या कामासाठीही आ.पाटील यांनी 11 कोटी 82 लक्ष रुपये निधी मंजुर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्य टप्पा-2अंतर्गत ह्या कामांचा समावेश आहे. या दोनही रस्त्यांच्या कामांचा आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, निमगुळ पुलाच्या कामाचा दिलेला शब्द आज पुर्ण झाल्याचा मला आनंद आहे. बोरी आणि पांझरा नदीवर विविध ठिकाणी पुलांच्या कामे करण्यात आली आहेत. धुळे तालुक्यात विकासाची अनेक कामे केली आहे.विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे यापुढेही तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले. धुळे तालुक्याच्या विकासासाठी शासन दरबारी भांडत राहून तालुक्याचे ज्वलंत प्रश्न विधानसभेत मांडत आलो आहे. असेही आ.पाटील यांनी सांगितले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,माजी सभापती गुलाबराव पाटील,पं.स.माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे,गंगाधर माळी,ज्येष्ठ नेते उत्तम राजपुत,अॅड.बी.डी.पाटील, संतोष राजपुत,जि.प.सदस्य अरुण पाटील,निमगुळ सरपंच पांडूरंग मोरे,माजी सरपंच नवनीत मोरे,संतोष पाटील, गणेश गर्दे,कृष्णा पाटील,विजय पाटील,रविंद्र राजपूत,भाऊसाहेब पाटील,चिंचखेडा सरपंच बारकु सोनवणे,माजी सरपंच चैत्राम पाटील, रमेश काशिनाथ पाटील मराठे, ग्रा.प.सदस्य सुभाष पवार, आण्णा मराठे, बापू पाटील, संदिप पाटील,किशोर देसले,लहू देसले,आमदड रोहिदास पाटील,सुनिल मराठे, बाबाजी पाटील माजी सरपंच सावळी,योगेश पाटील,कारभारी शिंदे, दगाजी पाटील तसेच निमगुळ येथील शांताराम मराठे, हर्षल सुर्यवंशी,युवराज चव्हाण,दिगंबर मराठे,रमेश मोरे,बालु मोरे, दशरथ पाटील,भटू सोनवणे,दिलीप जैन,बापू पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमात सरपंच पांडूरंग मारे,पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.