रस्ते कामातून विकासाची घोडदौड
धुळे : धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येत असून रस्ते कामासह विविध विकास कामांची घोडदौड सुरु आहे. त्याअनुषंगाने आ.कुणाल पाटील यांनी मंजुर केलेल्या चिंचवार ते सैताळे रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. या कामासाठी एकूण 1 कोटी 91 लक्ष रुपयांचा निधी आ. पाटील यांनी मंजुर केला आहे.
धुळे तालुक्यातील सिंचन बंधारे,बोरी-पांझरा नदीवर पुलांचे बांधकाम,रस्ते यांच्यासह धुळे ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकासाची कामे करुन तालुक्यात विकासाची घोडदौड आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. धुळे तालुक्यातील चिंचवार ते सैताळे रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सदर रस्त्याच्या कामासाठी आ. कुणाल पाटील यांनी एकूण 1 कोटी 91 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. त्याकरीता आ.पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत या रस्त्याचे काम होत आहे. या निधीतून सैताळे चिंचवार रस्त्याचे डांबरीकरण होणार असून आवश्यक त्या ठिकाणी पाईप मोर्यांचे बांधकाम केले जाणार आहे. सदर रस्त्याचे काम होत असल्याने सैताळे, चिंचवारसह परिसरातील रहिवाशी, शेतकरी, वाहनधारक यांची गैरसोय दूर होणार असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या कामाचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी भूमीपुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक एन. डी. पाटील, कृषीभूषण भिका पाटील, सैताळे सरपंच गिरधर मोरे, माजी सरपंच सुनिल पाटील, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, रवि मराठे, लाकमानी उपसरपंच बाजीराव महाले, सैताळे पो. पाटील त्र्यंबक पाटील, जिभाऊ सखाराम पाटील, दिलीपसिंग गिरासे, माजी सरपंच भटू पाटील, भटू गिरासे, उपअभियंता व्ही. एम. पाटील, सहा. अभियंता सुर्यवंशी, प्रदिप पाटील, पंडीत पाटील, प्रशांत पाकळे, कांतीलाल पाटील, बन्सीलाल पाटील, एकनाथ पाटील, शिवराम पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रेम पाटील, योगेश पाटील, गोपी महाले, दत्ता नागापुरे, जगन्नाथ पाटील, सोपान पाटील यांच्यासह सैताळे, चिंचवार, लामकानी, वडणे, नि कुंभे, शिरधाणे प्र. नेर येथील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.