उत्तर महाराष्ट्रातील 31 सामाजिक संस्थांना पुरस्कार
धुळे : उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील 31 स्वयंसेवी संस्थांना उत्कृष्ट NGO पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महा NGO फेडरेशन पुणे, सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था धुळे आणि जोशाबा सांस्कृतिक क्रिडा मंडळ सोनगीर यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील 31 संस्थांना हे पुरस्कार देण्यात आले. धुळे येथे १४ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा NGO फेडरेशनचे संस्थापक तथा गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा होते. यावेळी धुळे महानगरपालिकेच्या उपायुक्त पल्लवी शिरसाठ, डॉ. संजय शिंदे, सरकारी कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, द्वारकाधीश प्रतिष्ठानचे बापुजी शेलार, रोटरी धुळे क्रॉसरोडचे दीपक अहिरे, NGO फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा मिनाताई भोसले, जोशाबा सांस्कृतिक क्रिडा मंडळाचे दिलीप माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शेखरभाऊ मुंदडा म्हणाले की, महाराष्ट्रात लाखो NGO रजिस्टर आहेत. पण योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना सामाजिक उपक्रमात शासकीय निधी आणता येत नाही किंवा त्यांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवता येत नाहीत. म्हणून महा NGO फेडरेशनची स्थापना करून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त NGO ना NGO बाबतीत मार्गदर्शन मिळावे, त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे म्हणून महा NGO फेडरेशनची स्थापना केली आहे. गेल्या पाच वर्षात अनेक NGO ना अनुदान मिळवून देण्यासाठी NGO फेडरेशनने प्रयत्न केले. त्यातून अनेक संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सन्मान सोहळा देखील महा NGO फेडरेशन आयोजित करत असते. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा उत्तर महाराष्ट्रस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होय. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 31 सामाजिक संस्थांना पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा मिनाताई भोसले यांनी केले. त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे शेतकरी शेतात धान्य पेरताना त्या शेतात किती उगवणार? काय उगवणार? याचा विचार करत नसतो; फक्त पेरणीवर शेतकरी लक्ष केंद्रित करत असतो. त्याप्रमाणे आम्ही सामजिक संस्था चालविणारे NGO प्रतिनिधी रात्रंदिवस काम करत असतो. आम्हाला काय मिळेल हे माहित नसते. कधी आमचे काम स्विकारले जाते, कधी स्विकारले जात नाही. याच आशेवरती आम्हाला आज ना उद्या आमच्या शेतात यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
सन्मानपत्र वाचन करीत प्रमुख पाहुण्यांचा परिचय जोशाबा सांस्कृतिक क्रिडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप माळी यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महा NGO फेडरेशनचे पदाधिकारी, सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेचे पदाधिकारी, जोशाबा सांस्कृतिक क्रिडा मंडळ सोनगीरचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आखाडे यांनी केले.
पुरस्कार प्राप्त संस्था अशा :
1. स्व.दरबारसिंग राजपूत प्रतिष्ठान, भावेर
2. दिव्या गोमाता गोशाळा,धुळे
3. मातोश्री गुंताबाई आखाडे बहु. कृषी व पशु संशोधन संस्था, महिंदळे धुळे
4. उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र
5. इंदिरा महिला मंडळ धुळे
6. ग्राम अस्तित्व फाउंडेशन
7. मानस फाउंडेशन
8. श्रीमती एम. एम. चतुरमुत्था पांसझरापोळ एवं प्राणीरक्षक संस्था
9. कल्पतरू महिला विकास मंडळ धुळे
10. ग्रामविकास प्रतिष्ठान
11. दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन, नंदुरबार
12. साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर
13. ग्लोबल व्हिजन सोशल वेल्फेअर फाउंडेशन, नाशिक
14. युवक मित्र परिवार, नंदुरबार
15. गायत्री फाउंडेशन, नंदुरबार
16. अवंता फाउंडेशन
17. मुक्ता आदिवासी महिला बहुद्देशीय संस्था, धुळे
18. कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य नाशिक
19. स्व. सुकलाल सखाराम माळी सार्वजनिक वाचनालय, म्हसाळे
20. नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान
21. नेटवर्क ऑफ धुळे बाय पिपल लिविंग विथ एच. आय. व्ही.
22. राजमुद्रा प्रतिष्ठान
23. सहारा वेलफेअर सोसायटी
24. श्रीराम फाउंडेशन
25. संघर्ष समाज मंडळ रारामेश्वर ता. देवळा जि. नाशिक
26. खान्देश युवा फाउंडेशन
27. जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था प्रतापपूर ता. साक्री जि. धुळे
28. आई फाउंडेशन
29. श्री विश्वकर्मा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे, ता. जि. धुळे
30. नेटवर्क ऑफ नंदुरबार बाय पिपल लिविंग विथ एच.आय.व्ही./एड्स
31. नेहरू युवा मंडळ म्ह॒साळे