आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय झाला की मराठ्यांवर? सरकारने स्पष्ट करावे!
धुळे : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला घाबरून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी, आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार आहे की मराठ्यांवर? हेही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. अयोध्येत राममुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशात रामराज्य आल्याची वल्गना सत्ताधारी करीत आहेत. परंतु हे रामराज्य नसून, भाजपचे रावणराज्य असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.
सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणत मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये सडकुन टिका करायची आाणि त्यानंतर अवघ्या ५ दिवसातच या ७० हजार वाल्या दागींना मंत्रीमंडळात घ्यायचं महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप असणारा भाजपा खासदार ब्रिजभुषण विरोधात एक अवाक्षरही उच्चारायचे नाही. हे रामराज्य आहे का? हे तर भाजपाचे रावण राज असल्याची जहरी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने नाशिक विभागीय एकदिवसीय शिबिर धुळ्याजवळील गोंदूर येथील साईलक्ष्मी लॉन्स येथे रविवारी झाले. त्यानिमित्ताने काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह बडे नेते आले आहेत. या शिबिरासाठी आलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरुवातीला पत्रकार परिषदत घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्हाला रामराज्यही हवे आणि संविधान राज्यही हवे. रामराज्य म्हणजे धार्मिक राज्य नव्हे, रामराज्यात सर्वांना न्याय देण्याची भुमीका होती. सीतामाईबद्दल आक्षेप घेतल्यानंतर प्रभु श्रीरामाने देखील न्यायाची भुमीका घेतली होती. परंतु भाजपच्या राज्यात केवळ अन्याय सुरु आहे. रावणराजपेक्षाही भयानक स्थिती आहे. ७० हजार कोटींचा घोटाळा केला. असा आरोप ज्यांच्यावर केला. त्यांना अवघ्या ५ दिवसात मंत्रीमंडळात मानाची खुर्ची द्यायची. याला रामराज्य म्हणायचे का? देशासाठी खेळामध्ये विविध पदकांची कमाई करत देशाची शान असलेल्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणार्या भाजपा खासदार ब्रिजभुषणबद्दल गप्प रहायचे याला रामराज्य म्हणायचे का? हे रामराज्य नव्हे तर रावणराज्य आहे. अश्रु गाळण्याचे ढोंग केले जाते. शेतकर्यावर अन्याय होत आहे. विखरण ता. शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांना मंत्रालयात आत्महत्या करावी लागते. शेतकर्यांची लुट सुरु आहे. विविध स्पर्धा परिक्षमध्ये भ्रष्टाचार सुरु आहे. नोकरीसाठी पैसे घेतले जात आहे. त्यामुळे अशा दुराचारी, अत्याचारी सरकारला जनताच तडीपार करणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिलं असं सरकार म्हणतं. तर ते नेमकं कुठून दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडूनच आरक्षण दिलं पाहिजे. आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशाातून सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसींना हे जाहीर करावं, दोन जातींना, समााजानां झुंझावण्याचे काम या सरकारने केले आहे. फसवाफसवीचे राजकारण सरकारने केले असून मराठा-ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याचे पाप राज्य सरकारने केले आहे. आज काढलेला अध्यादेश हा घोळ निर्माण करणारा आहे. लोकशाही संपविण्याची व्यवस्था सरकारने निर्माण केली आहे. माध्यमांवरही दबाव आहे.
मुळात भाजपकडे स्वतःचं काहीच नाही. आज जे काही खासदार आहेत. त्यातील ६५ टक्के खासदार हे आमच्याच विचारांचे आहेत. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी लढण्यासाठी सज्ज आहे. इंंडिया आघाडीच्या माध्यमातून राज्यात ४८ जागा लढत एकास-एक लढत देवू. प्रकाश आंबेडकरांनाही सोबत घेवू अशी भुमीका नाना पटोले यांनी मांडली.
काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला पत्रकार परिषदेत म्हणाले की, सर्व मतभेद दुर करत एकता दाखवत काँग्रेस कार्यकर्ता मैदानात उतरले आहेत. लोकांना धर्माच्या आधारावर विभाजीत करण्याचे काम सरकार करीत आहेत. हे सर्वात मोठे आवाहन असून रोखणे आहेत. खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा सर्व जनतेला सोबत घेण्याचे आहे. देशाला आज काँग्रेसची गरज आहे. सांप्रदायीक सदभाव ठेवण्यासाठी काँग्रेस सक्षम आहेत. महाविकास आघाडी मजबुत करण्यासाठी आम्ही संघटन मजबुत करीत आहोत. देशात इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे, पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, युवराज करनकाळ यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा