आमदारांच्या निधीतून शास्त्रीनगरात रस्ता
धुळे : शहरातील मुलभूत सुविधा जसे रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास केला. ज्या भागात रस्ते, गटारी, पाईपलाईन नाही, त्या भागासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे.
शहराच्या कॉलनी भागात असलेल्या शास्त्रीनगर, नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी २५ लाखांचा निधी आमदार फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला.
या कामाचा शुभारंभ सोमवारी आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार राजेंद्र गर्दे, राजेंद्र चितोडकर, बलराज नेरकर, प्रमोद पाटकर, खैरनार सर, संजय ढगे, रमेश वाघ, पी. एस. बडगुजर, मगन कांबळे, नरेंद्र जगताप, संध्या वाघ, विजया गोरे, मनीषा पाटकर, रत्ना लोहार, आसिफ शाह, हारूण खाटीक, वसिम पिंजारी, सउद आलम उपस्थित होते.