डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील दारू दुकान हटविण्यासाठी समाज एकवटला
धुळे : शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी असलेले दारू दुकान हटविण्यासाठी समाज एकवटला आहे. यासाठी विनोद वाईन शॉप हटाव समिती स्थापन केली. रविवारी दुपारी संदेश भूमी येथे झालेल्या बैठकीनंतर सोमवारी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, विभाग, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांना देखील पाठविल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. हा पुतळा लाखो अनुयायांचे प्रेरणास्त्रोत आहे. पुतळ्यामागेच असलेले विनोद वाईन शॉप अनेक आंदोलनानंतर सुध्दा आजपावेतो स्थलांतरीत झालेले नाही. त्यामुळे लाखो अनुयायांच्या भावना दुखावलेल्या आहेत. वास्तविक शासनाच्या निर्णयानुसार (कलम 56) महापुरुषांच्या पुतळ्यालगत मद्य विक्री केंद्र सुरु असणे हा मोठा गुन्हा आहे. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी अनेक प्रकारच्या परवानगी घेणे कायद्यानुसार आवश्यक असते. अशा प्रकारच्या सर्व परवानग्या घेवून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सदर ठिकाणी आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांत अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांनी, विनोद वाईन शॉप स्थलांतरीत व्हावे यासाठी निदर्शने, आंदोलने केली आहेत. लेखी निवेदने सुध्दा दिलेली आहेत. परंतु आजपावेतो हे दारुचे दुकान स्थलांतरीत झालेले नाही. या वार्डमध्ये राहणाऱ्या सुमारे दोन ते अडीच हजार महिला भगिनींनी सह्यांचे लेखी निवेदन दिलेले आहे. त्याचाही काही उपयोग झाला नाही. पुतळ्याच्या मागील बाजुस असलेल्या विनोद वाईन शॉपच्या पायऱ्यांवर बसून अनेक मद्यपी दारु पिताना दिसतात. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मद्यपींमुळे या ठिकाणी कुठलीही विपरीत घटना घडू शकते हे नाकारता येवू शकत नाही. त्यास विनोद वाईन शॉपचे चालक, मालक हेच जबाबदार असतील. या परिसरातच पोलीस अधिक्षक यांचे कार्यालय व धुळे शहर पोलीस स्टेशन आहे. हाकेच्या अंतरावर दारुबंदी अधिकारी यांचे कार्यालय तसेच शाळा देखील जवळच आहेत. दारुबंदी अधिकारी व प्रशासन कायद्यातील पळवाटा शोधून सदर दुकानदारास मदत करतात की काय? असे वाटते. वास्तविक राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या चहू बाजुने 100 मीटर अंतरात कुठलेही मद्य विक्रीचे दुकान नको हे कायद्यात नमूद आहे. राष्ट्रपुरुषांचा सन्मान व पावित्र्य राखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन सदरचे वादग्रस्त वाईन शॉप त्वरीत हटवावे ही अनेक वर्षांपासूनची अनुयायांची मागणी मान्य व्हावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. असे न झाल्यास 5 फेब्रुवारी रोजी सनदशीर मार्गाने चौका-चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा दिला आहे.
आंदोलनात विविध वस्त्या, संघटना सहभागी : या आंदोलनात भिमनगर, साक्री रोड, धुळे, रमाई नगर, साक्री रोड, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आग्रा रोड, धुळे, महात्मा फुले नगर, मोगलाई, धुळे, रमापती चौक, मोगलाई, धुळे, मिलिंद हौसिंग सोसायटी, साक्री रोड, धुळे, संघमा चौक, रामनगर, धुळे, सिध्दार्थ नगर, फाशी पुल, धुळे, लिलाबाई चाळ, चितोडरोड, धुळे, संबोधी नगर, सुरत बायपास हायवे, धुळे, प्रबुध्द मित्र मंडळ, स्टेशन रोड, धुळे, चंद्रमणी चौक, वडजाई रोड, धुळे, निळा चौक, 80 फुटी रोड, नटराज टॉकीज जवळ, धुळे, प्रकाश टॉकीज चौक, पारोळा रोड, धुळे, दादासाहेब गायकवाड चौक, जुने धुळे, माता रमाई नगर, सावरकर पुतळा, धुळे, नागसेन नगर, मोठा पुल पंचवटी देवपूर, धुळे, सिध्दार्थ नवयुवक मित्र मंडळ, लॉ कॉलेज, देवपूर, धुळे, चंदन नगर, जयहिंद कॉलेज परिसर, देवपूर, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे, गौतम नगर, गोंदूर रोड वलवाडी, धुळे, पंचशिल मित्र मंडळ, गोंदूर रोड वलवाडी, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भोकर, धुळे, राजवाडा प्रतिष्ठान वलवाडी, धुळे, भिमशक्ती मित्र मंडळ, दैठणकर नगर, देवपूर, धुळे, पापा खरात ग्रुप, स्वस्तीक सिनेमा, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महिंदळे, धुळे, जय भिम मित्र मंडळ ग्रामस्थ, आनंदखेडे ता.जि धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ग्रामस्थ अवधान ता. जि. धुळे, त्रिरत्न पंचशील स्तंभ, ग्रामस्थ नगाव ता.जि. धुळे, त्रिरत्न पंचशील स्तंभ, ग्रामस्थ फागणे ता. जि. धुळे.
यांनी दिले निवेदन : निवेदन देताना नयना दामोदार, सरोज कदम, पूनम शिरसाठ, अनिता सोनवणे, माया पानपाटील, अंजना चव्हाण, वंदना बागुल, कल्पना सामुद्रे, रंजना इंगळे, मंगला मोरे, सरला निकम, पूनम गायकवाड, शशीकांत वाघ, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, अनिल दामोदर, नगरसेवक नागसेन बोरसे, सुरेश लोंढे, ॲड. राहुल वाघ, ॲड. विशाल साळवे, आनंद लोंढे, आनंद सैंदाणे, अरविंद निकम, शंकर खरात, किरण गायकवाड, बापू बागुल, सागर मोहिते, राहुल वाघ, संजय अहिरे, मनीबाबा खैरनार, योगेश पगारे, कल्याण गरुड, सिध्दार्थ वाघ, निशांत मोरे, आकाश बागुल, गौतम पगारे, बबलु खरात, मुकेश खरात, भुषण गायकवाड, भैय्या वाघ, बॉबी नागमल, बापू बाविस्कर, संजय जवरास, गणेश जगदेव, बापू पहेलवान, अजिंक्य गायकवाड, चेतन गायकवाड, दीपक खैरनार, आबा वाघ, राकेश मोरे, रवि नगराळे, ॲड. विशाल भामरे, श्रावण खैरनार, संतोष अमृतसागर, विशाल पगारे, समाधान बैसाणे, गौतम मोरे, आकाश कदम, आनंद अमृतसागर, भाऊसाहेब बळसाणे, किशोर पवार, ॲड. ऋतुराज वाघ, देविदास वाघ, जितु नगराळे, बापू अहिरे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा
बाबासाहेबांच्या स्मारकाजवळील दारू दुकानाचा बोर्ड फोडला!