100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा
नंदुरबार : जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 75 हजार 337 पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 6 शिधाजिन्नसांचे संच असलेला ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 100 रुपयांत एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे 6 शिधाजिन्नस संच मिळणार आहेत. गोरगरीब कुटूंबीयांसाठी हा आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. सद्याच्या दिवसांत खाद्यतेल, डाळी, साखरेचे भाव वाढले की, सर्वसामान्य कुटूंबांची अडचण होते. याबात मंत्रिमंडळ निर्णय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिली आहे.
हे असतील पात्र : अंत्योदय, प्राधान्य कुटूंब, पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असून आनंदाचा शिधा वाटपासाठी जिल्ह्यात पुरेसा धान्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयात रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे 6 शिधाजिन्नस संच मिळणार आहे. हे साहित्य खुल्याबाजारात किमान 300 ते 350 रुपयांचे आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वितरीत करावयाचा संच 22 जानेवारी 2024 पासुन सुरू झाला असून 29 फेब्रूवारी 2024 पर्यंत तो मिळू शकेल. जिल्ह्यातील 2 लाख 75 हजार 337 पात्र कुटूंबाना आनंदा शिधा वाटपाचा लाभ मिळणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील रेशनकार्डधारक कुटूंबांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ थेट रेशन दुकानांमधून मिळणार आहे. हे संच पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतील. जिल्हयातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारक लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातुन ‘आनंदाचा शिधा’ संच प्राप्त करुन घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दृष्टिक्षेपात वितरण
नंदुरबार : 56 हजार 619
नवापूर : 52 हजार 322
शहादा : 65 हजार 500
तळोदा : 30 हजार 030
अक्कलकुवा : 42 हजार 878
अक्राणी : 27 हजार 988
एकूण : 2 लाख 75 हजार 337