धुळे महानगर भाजपचे कार्यालय राज्यात गौरवास्पद ठरेल
धुळे : शहरात चाळीसगाव रोडवर साकारत असलेल्या भाजपच्या हायटेक कार्यालयाच्या बांधकामाची भाजपा नेते, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी रविवारी पहाणी केली आणि समाधान व्यक्त केले.
भाजप धुळे महानगर कार्यालय हे संपूर्ण महाराष्ट्रात गौरवास्पद ठरेल अशा शब्दात आमदार रावल यांनी कौतुक केले. येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी हे कार्यालय अत्यंत महत्वाचे संपर्क केंद्र ठरेल, असेही आमदार रावल म्हाणाले.
या प्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जि. प. सदस्य राम भदाणे, नगरसेवक नरेश चौधरी, राजेश पवार, जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील, सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, सुहास अंपळकर, लोकेश विभूते, विनायक भामरे आदिंसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.