विनोद वाईन शॉप हटावसाठी आंदोलक आक्रमक, ठिकठिकाणी रास्तारोको
धुळे : विनोद वाईन शॉप हटाव समिती व समस्थ आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवारी सुरत बायपास महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने अटक केली. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात, जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, किशोर पवार, पूजा मोहिते, लता मोहिते, वाघ ताई, भामरे ताई, मालता बागुल, विशाल वाघ व संबोधी नगर परिसराचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईप शॉप हटविण्यासाठी आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यांना विविध स्तरातुन पाठींबा मिळत असून आज आंदोलकांसह आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांनी फाशीपुल, शैक्षणिक चौकांसह जागोजागी रास्तारोको आंदोलन करुन निषेध नोंदविला. विनोद वॉईन शॉप हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाही केल्या.
धुळे शहरातील बसस्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा असून या पुतळ्यामागे विनोद वॉईन शॉप नावाचे मद्यविक्रीचे दुकान आहे. या मद्यविक्री दुकानामुळे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले असून हे दुकान हटविण्याची मागणी करत गेल्या ५ दिवसांपासुन आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाला आंबेडकर प्रेमी जनतेने जाहीर पाठींबा देत रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील मिल परिसरातील चितोड नाका चौकातून, बाबा ग्रुपच्या सदस्यांनी जोेरदार घोषणाबाजी करत फाशीपुल चौकाकडे मार्गक्रमन केले.फाशीपुल चौकात सिध्दार्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, देशमुख नगर, नवजीवन नगर येथील रहिवाशांनी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत विनोद वाईन हटविण्याची मागणी केली. या रास्ता रोको आंदोलनात बाबा ग्रुपचे मनीबाबा खैरनार, अजय सरदार, सचिन बिर्हाडे, दीपक साळवे, प्रतिक सोनवणे, सोनू मैराळे, भुषण खरात, जय सोनवणे, अक्षय बच्छाव, प्रशांत जमदाळे, कमलेश वाल्हे, महेश पगारे, अजय मोरे, दादु साळवे, दादा साल्हे, मयुर वाघ तसेच सिध्दार्थ नगर आणि परिसरातील किरण गायकवाड,गौतम गायकवाड, बबलु मोरे,भूषण गायकवाड, अजिंक्य गायकवाड, सचिन अहिरे, मयुर गायकवाड,अनिकेत गायकवाड, संजय लाडे, सिध्दार्थ पगारे, कल्पेश मगर, रघुनाथ चौधरी, बबलु रामराजे, प्रशांत जमवणे, हेमराज क्षीरसागर ,प्रकाश विरकर, तुषार गायकवाड, पंकज गायकवाड आदी सहभागी झाले होते.
गेल्या ५ दिवसांसून उपोषण करणारे आनंद लोंढे आणि त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी कमलाबाई शाळेजवळील चौकात जात दुपारी १२.३० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी विनोद वॉईन शॉप हटावच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. माध्यमांशी बोलताना आनंद लोंढे म्हणाले की, गेल्या पाच दिवसापासून विनोद वॉईन शॉप हटावसाठी आमचे उपोषण सुरु आहे. प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पावित्र्यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठीनाही, त्यामुळे विनोद वॉईन शॉप हटवावे,जोपर्यंत वॉईन शॉप हटविण्याचे आदेश निघत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. वॉईन शॉप हटावसाठी ५ दिवसच काय पंन्नास दिवस जरी उपोषण करावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही असे ते म्हणाले.
आझाद पक्षाच्या आंदोलनाला सेनेचा पाठींबा
धुळे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बसस्थानकाजवळील पुर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूस सुरु असलेले विनोद वाईन शॉप हे दुकान हटविण्यासाठी आझाद समाज पक्षातर्फे आंदोलन सुरु असून या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाने जाहीर पाठींबा दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आंदोलनस्थळी जावुन आंदोलकांची भेट घेत जिल्हा शिवसेनेच्यावतीने पाठींब्याचे पत्र दिले. आझाद समाज पक्षाचे आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विनोद वॉईन शॉप हटावसाठी आंदोलन सुरु आहे. संबंधीत दुकान मालकाकडून डॉ.आंबेडकरांविषयी गैरवक्तव्य देखील करण्यात आले आहे. विनोद वाईन शॉपमुळे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. हे वॉईन शॉप हटविण्यात यावे यासाठी सेनेच्या नेत्यांसोबत वरिष्ठ पातळीवर हा विषय मांडून निश्चितपणे मार्गी लावू असे सेना धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी सांगतले.
हेही वाचा