५५० लाखांच्या प्रमुख पाच रस्त्यांच्या डांबरीकरणाचे खा. डॉ. भामरेंच्या हस्ते भुमीपुजन
धुळे : तालुक्याच्या विकासासाठी बाळासाहेब भदाणे यांनी झोकून दिले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर झालेल्या धुळे तालुक्यातील बोरकुंड, रतनपुरा जि. प. गटातील प्रमुख पाच रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमीपूजन नुकतेच खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. या साडेपाच कोटींच्या रस्त्याच्या कामांमुळे ग्रामस्थांच्या दळवळाची मोठी सोय होणार असून ग्रामस्थांनी बाळासाहेब भदाणे यांचे विशेष आभार मानले आहेत.
धुळे तालुक्यातील बोरकुंड, रतनपुरा मतदार संघासह संपुर्ण तालुक्याच्या विकासासाठी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व भाजपा नेते बाळासाहेब भदाणे यांनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नाने तालुक्यात अनेक विकास कामे झाली आहे. तालुक्यातील अनेक रस्त्याचीही वाताहत झालेली होती. ही बाब लक्षात घेवून व ग्रामस्थांच्या आग्रही मागणीनुसार बाळासाहेब भदाणे यांनी सतत पाठपुरावा करून जुनवणे ते हेंद्रूण, होरपाडा ते मांडळ, कुळथे ते नंदाळे बु, बोरकुंड ते तरवाडे व तरवाडे ते लोंढरे या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल साडेपाच कोटीचा निधी खेचून आणला. या रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी भाजप धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपा नेते बाळासाहेब भदाणे, जि. प. चे माजी सदस्य प्रभाकर पाटील, जि. प. सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, भाजप उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, रितेश परदेशी, पं. स. चे उपसभापती देवेंद्र माळी, माजी उपसभापती भैय्यासाहेब पाटील, पं. स.सदस्य रंगुताई ठाकरे, बाबाजी देसले, तालुका सरचिटणीस श्याम बडगुजर, माजी सदस्य मुन्ना पवार, डॉ. राजेंद्र पाटील, बोरकुंड सरपंच हेमंत भदाने, राजेंद्र मराठे, संजय माळी, संजू भाऊसाहेब, जुनवणे सरपंच योगेश पाटील, धाडरे संरपंच राहुल पाटील, हेंद्रूण सरपंच गोरख राजपूत, उपसरपंच दीपक कोळी, संजय राजपूत, मोघण उपसरपंच विलास पाटील, सुशील गवळी, जिभो पाखले, विलास पाटील, किशोर पाटील, कैलास पाटील, गोरख माळी, मोरदड सरपंच गोविंदा पाटील, चेअरमन गुणवंत पाटील, हरिदास खैरनार, संजय पाटील, नाना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भिरडाई संरपंच राजेश पाटील, चांदे उपसरपंच रावसाहेब पाटील, नंदाळे सरपंच
योगेश पाटील, नाणे सरपंच अजय राजपूत, विसरणे सरपंच रवी पाटील, दोदवाड ग्रा. पं. सदस्य रवींद्र बिर्हाडे, भानुदास पाटील, भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितू जैन, होरपाडा सरपंच बुधा खुरणे, रवींद्र कठाळे, रामचंद्र खैरनार, शामराव वाघ, भीमराव कठाळे, निलेश कठाळे, कौतिक वाघमोडे, विठोबा कठाळे, अतुल कठाळे, दगडू अहिरे, जिभाऊ दळवी, कुळथे संरपंच गंगुबाई सोनवणे, उपसरपंच दिनेश रोज, ग्रा.पं. सदस्य बापू रतन नवघरे, वर्धमान जाट, रमेश मराठे, योगेश राठोड, अरुण शांताराम कव्हाड आदीं ग्रामस्थ व बाळासाहेब भदाणे मित्रपरिवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.