गोरक्षा विशेष पथक नियुक्त करा!
धुळे : गोरक्षा विशेष पोलिस पथक नियुक्त करावे, अशी मागणी आज भाजपातर्फे करण्यात आली. याबाबत महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांना निवेदन देण्यात आले.
महानगरत गोतस्करांची मग्रुरी व क्रूरतेने होत असलेली गोवंशाची अवैद्य वाहतूक नित्याची झाली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गो-रक्षक पोलिसाच्या मदतीने नेहमी तत्पर असतात. असे प्रामाणिक प्रयत्न करताना मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे गो-तस्कर गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करतात. पोलीस प्रशासन आमचे काहीच बिघडवू शकत नाही, गो तस्करांचा माज एवढा वाढला आहे की प्रामाणिक गोरक्षकांना दादागिरीने शिवीगाळ मारहाण देखील करतात. या प्रकारामुळे संवेदनशील असलेल्या धुळे महानगराचे चांगले वातावरण बिघडवण्याचा धोका संभवतो. जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबतीत विशेष लक्ष घालून गोरक्षा विशेष पथक नियुक्त करावे अशी मागणी धुळे महानगर जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र अंपळकर यांनी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ओम प्रकाश खंडेलवाल, चेतन मंडोरे, ज्येष्ठ नेते विजय पाछापूरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आहिरराव, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, पंकज धात्रक, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली शिरसाठ, जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील, उपाध्यक्ष दिलीप शितोळे, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, ॲड. किशोर जाधव, योगेश मुकुंदे, प्रशांत बागुल, योगिता बागुल, सुनिता सोनार, मोहिनी धात्रक, उमा कोळवले, हेना मेवाणी, हेमानी विश्वकर्मा, राजेश पवार, योगेश पाटील, पवन जाजू, सुरज चौधरी, शिवाजीराव काकडे, केदार मोरांकर, अरुण पवार, ईश्वर पाटील, नंदू ठोंबरे, बंटी धात्रक, भागवत चितळकर, शरद चौधरी, सुरेश बहाळकर, अनिल भडागे, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, नरेश गवळी, विनायक भामरे उपस्थित होते.