गोंदूरच्या सुपूत्राची तहसिलदारपदी निवड आ. कुणाल पाटील यांच्यातर्फे सत्कार
धुळे : तहसिलदार पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत गोंदूर येथील माजी सरपंच प्रा. प्रकाश भदाणे यांचे सुपूत्र अमित भदाणे हे राज्यात अठराव्या क्रमांकाने उतीर्ण झाले. त्याबद्दल धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अश्विनी कुणाल पाटील, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, कृऊबा संचालक साहेबराव खैरनार, बापू खैरनार, गोंदूर उपसरपंच हिरामण पाटील, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी सरपंच प्रा. प्रकाश भदाणे, गरताड सरपंच राजीव पाटील, गोंदूर येथील प्रविण पाटील, रावसाहेब पाटील, दिलीप पाटील, भारत पाटील, योगेश पाटील, ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते.