धुळेकरांना पोलिसांच्या क्युआर कोड पेट्रोलिंगची सुरक्षा
धुळे : शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी धुळे पोलिसांनी अत्याधुनिक क्यूआर कोड पेट्रोलिंग सुरू केली आहे. या पेट्रोलिंग सिस्टीमनुसार धुळे शहर उपविभागात सहा पोलीस स्टेशनचे 29 बीट मार्शल असतील व प्रत्येक बीट मार्शल पंधरा ते वीस ठिकाणी दोन शिफ्टमध्ये क्युआर कोड पेट्रोलिंग करतील.
या भागात प्रामुख्याने होईल पेट्रोलींग : धुळे शहर उपविभागातील विरळ वस्ती, बाजारपेठ, हायवेलगतच्या कॉलनी, पेट्रोल पंप, एटीएम, धार्मिक स्थळे, पुतळे, संवेदनशील ठिकाणे, कॉलनी परिसर, मिश्र वस्ती परिसर, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन अशा विविध सुमारे चारशे ठिकाणी दररोज पेट्रोलिंगद्वारे वाॅच ठेवला जाणार आहे.
काय आहे क्युआर कोड पेट्रोलिंग : दररोज पेट्रोलिंग करताना क्युआर कोड स्कॅन करुनच पेट्रोलिंग केली जाईल. त्यासाठी एक ॲप तयार केले आहे. त्यात प्रत्येक क्युआर कोड स्कॅन झाल्यानंतर त्याच्या नोंदी ॲपमध्ये होतील आणि प्रत्येक बीट मार्शलने किती वाजता कोणत्या व किती ठिकाणी भेट दिली याच्या नोंदी होतील. पेट्रोलिंगची प्रत्येक नोंद ही जिल्हा नियंत्रण कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्याकडे दररोज दिसेल.
धुळेकरांना अशी मिळणार सुरक्षा : पोलिसांच्या अत्याधुनिक क्युआर कोड पेट्रोलिंगमुळे धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार आहे. तसेच चोरी, घोरफोडी, विटंबना यांसारख्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. त्यामुळे धुळेकर नागरिकांनी या क्यूआर कोड लावलेल्या ठिकाणी व पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमास योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक, ऋषिकेश रेड्डी यांनी केले आहे.
हेही वाचा
तोतया जीएसटी अधिकारी प्रकरणात परराज्यातील टोळीला अटक होण्याची शक्यता
सशस्त्र दरोडेखोरांची टोळी एलसीबीच्या जाळ्यात
छत्रपती संभाजी नगरातून चोरीस गेलेली बस आढळली धुळ्यात
राईनपाडा सामुहिक हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप