माजी मंत्री रोहिदास पाटील रुग्णालयात दाखल, कोल्हापूर येथे उपचार सुरु
धुळे : खान्देश नेते माजी मंत्री, दाजीसाहेब रोहिदास पाटील हे आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे गेले असतानाच गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे फूफ्फूस कमी क्षमतेने काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. मात्र गुरुवारपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील, आ. कुणाल पाटील हे सोमवारपासून कोल्हापूर येथेच आहेत. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयात न येता आपल्या घरीच माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.