आमदारांच्या निधीतून प्रभाग क्रमांक १९ मध्ये रस्त्यांची सुविधा
धुळे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये पठाण गोडाऊनपासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
धुळे शहरात अल्पसंख्याक भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यांसारख्या मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबला. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल झाले. परंतु डॉ. फारुख शाह आमदार म्हणून निवडून आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.
आमदार फारुख शाह यांनी विविध वस्त्यांमधील विकासाचा अनुशेष शोधून काढण्यासाठी सर्वंकष अभ्यास केला. ज्या भागात रस्ते, गटारी, पाईपलाईन नाही त्या भागांसाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे. प्रभाग क्रमांक १९ मध्ये पठाण गोडाऊनपासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची पार दुरवस्था झाली होती. या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने नागरिकांनी यासंदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन देवून मागणी केली होती. रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरीकांचे फार हाल होत आहेत याची जाणिव नागरिकांनी त्यांना करून दिली. रहिवाशांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये पठाण गोडाऊनपासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता करणे या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाचा 12 फेब्रुवारी रोजी आमदारांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा नागरी सत्कार केला आणि आभार मानले.
फराद जलील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदारांसोबत सलीम शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक डॉ. सरफराज अन्सारी, नगरसेवक मुक्तार अन्सारी, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, ईस्माईल अन्सारी, मौलवी शकील, प्यारेलाल पिंजारी, निजाम सैय्यद, छोटू मच्छीवाले, सउद सरदार, हारुण खाटीक, आसिफ शाह, सुफी हाजी, इब्राहीम पठाण, सउद आलम, सलमान खान, मलेका खाटीक, कैसर अहमद, हालिम शमसुद्दिन, नाजिम शेख, मुजाहि्द शेख, रईस शाह, शाहिद शाह, रिझवान अन्सारी, अयुब अन्सारी, शब्बीर अन्सारी, अनिस काजी, इजहार हुसेन, दिलदार हुसेन, डॉ. बापुराव पवार, महेमुना अन्सारी, मोहम्मद हुसेन, अफसर शाह, कलाम अन्सारी, जैद जाकिर, हाशम अन्सारी, रियाज शाह, फैसल अन्सारी, इलियास सर, फकिरा बागवान, समीर मिर्झा उपस्थित होते.