महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी आमदार कुणाल पाटील बिनविरोध
धुळे : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. नागपूर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित आमदार पाटील यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.
आमदार कुणाल पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे चेअरमनपदाचा मान पहिल्यांदाच खान्देशला मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार पाटील यांच्या निवडीबद्दल धुळे शहरातील कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला.
महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी जिव्हाळ्याची असलेली संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडे पाहिले जाते. सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर पणन महासंघाच्या नागपूर येथील कार्यालयात चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी आमदार कुणाल पाटील यांचे नाव सर्वानुमते घोषीत करण्यात आले. त्यामुळे आमदार पाटील यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमन म्हणून खामगाव येथील प्रसन्नजीत पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली.
यावेळी निवडणूक अधिकारी शिंगतकर, नवनिर्वाचित संचालक सुरेश देशमुख, संजय खाडे, प्रफ्फुल मानकर, अनंत देशमुख, शिरीष धोत्रे, धृपतराव सावळे, संजय पवार, पंडीतराव चोखटे, अॅड. विष्णूपंत सोळंके, राजेंद्र केशवे, शिवाजीराव दसपुते, सुरेश चिंचोळकर, राजकिशोर मोदी, श्रीमती उषाताई शिंदे, श्रीमती सुनिता अळसपुरे उपस्थित होते.
आमदार कुणाल पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत धुळे येथील माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे उपस्थित होते.
धुळ्यात आनंदोत्सव : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या रुपाने खान्देशातून पहिल्यांदाच निवड झाल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी धुळे येथील कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी केली. एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, उपसभापती योगेश पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, एन. डी. पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, खरेदी विक्रीचे व्हाईस चेअरमन दिनकर पाटील, भिमसिंग राजपूत, दत्तू पाटील, संदिप पाटील, कृष्णा पाटील, विजय पाटील, संतोष राजपूत, नंदू धनगर, प्रकाश गुजर, ऋषीकेश ठाकरे, सुरेश भिल आदी उपस्थित होते.