धुळे : (जिमाका, 14 फेब्रुवारी, 2024 ) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेमार्फत इस्त्राईल या देशामध्ये कुशल बांधकाम कामगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, धुळे सुंदरसिंग वसावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
बांधकाम क्षेत्रात फ्रेमवर्क, सेट्रिंग, बार बेंडिग, सिरॅमिक टाईल्स, प्लास्टरिंग यासारख्या व्यवसायामध्ये 21 ते 45 वयोगटातील किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या बांधकाम कामगारांना 1.4 लाख ते 2 लाख मासिक वेतन देण्यात येते. यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागामार्फत बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगारांना परदेशात (इस्त्राईल) नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
इच्छुक बांधकाम कामगारांनी https://rojgar.mahaswayam.gov. in/#/mic या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी केले आहे.