केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले सहकुटुंब लक्षद्वीप दौऱ्यावर
बंगाराम बेट (लक्षद्वीप) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आजपासून (ता. 19) दोन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे लक्षद्वीपच्या आगत्ती विमानतळावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
ना. रामदास आठवले यांचे लक्षद्वीपच्या बंगाराम बेटावर आगमन झाले. बंगराम बेटावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वास्तव्य केले होते. त्याच प्रेसिडेन्सी विश्रामगृहात ना. रामदास आठवले यांनी सर्वप्रथम सहकुटूंब छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त वीनम्र अभिवादन केले. त्यानंतर बंगाराम बेटावर समुद्रात ना. रामदास आठवले यांनी त्यांचे पुत्र कुमारजित आठवले यांच्या समवेत स्कुबा डायव्हिंगचा खोल समुद्रात थरारक समुद्र सफारीचा आनंद घेतला. लक्षद्वीप दौऱ्यात ना. रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले आहेत.
देशाच्या समुद्रसीमांचे संरक्षण करण्यासाठी समुद्रदुर्ग उभरण्याची पहिली संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. समुद्र दुर्ग उभरण्याची देशात पाहिले सागरी आरमार उभारणारे दूरदृष्टीचे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत, असे सांगत ना. रामदास आठवले यांनी आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
लक्षद्वीप हे अत्यंत सुंदर बेट आहे. मालदीवपेक्षा अनेक पटीने लक्षद्वीप सुंदर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार आपण मालदीवचा दौरा रद्द करून लक्षद्वीप सहकुटुंब भेट दिली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीप या निसर्गरम्य सुंदर बेटाला आवर्जुन भेट द्यावी. भारतीय व्यावसायिकांनी हॉटेल इंडस्ट्रीने लक्षद्वीपकडे लक्ष दिले पाहिजे. नवीन हॉटेल पर्यटकांना आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे नविन हॉटेल उभारावीत असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
लक्षद्वीपमध्ये उद्या रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच उद्या दिव्यांग जनांसाठी उद्या एडीप कॅम्पद्वारे सहाय्यक वस्तूंचे वाटप ना. रामदास आठवले यांच्या हस्ते लक्षद्वीपची राजधानी कवरती येथे करण्यात येणार आहे.
ही संपूर्ण माहिती नामदार आठवले यांचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी ना. आठवले यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली असून, ही बातमी प्रसिद्ध करावी, असे आवाहन प्रसारमाध्यमांनाही केले आहे.