शांताराम मानसिंग चव्हाण प्रतिष्ठानचा जाणीव पुरस्कार वितरण सोहळा
धुळे : येथील शांताराम मानसिंग चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जाणीव पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शाहू नाटय मंदीर येथे वितरीत केले जाणार आहे. असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारिजात चव्हाण तसेच जाणीव पुरस्कार वितरण सोहळयाचे कार्याध्यक्ष कवी जगदीश देवपूरकर यांनी कळविले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनुप अग्रवाल, कैलास जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, डॉ. महेश घुगरी, प्रा. अरविंद जाधव, मनोज गर्दे, अतुल पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१९९५ पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून खान्देशाचे नाव उज्वल करणाऱ्या महनीय व्यक्तींना सदर पुरस्कार दिला जातो. खान्देशातील अॅड. उज्वल निकम (विधी), डॉ. श्रीपाल सबनीस (साहित्य), डॉ. न. म. जैन (दिव्यांग सेवा) स्व. कांतीलाल भाई गुजराथी (पत्रकारिता), स्व. प्राचार्य सदाशिवराव माळी (शैक्षणिक), डॉ. सुभाष भामरे, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे (वैद्यकीय), स्व. कांतीलालजी जैन (सहकार), सुरेश खानापूरकर (जलतज्ञ), कॉ. नजूबाई गावीत (साहित्य) आदी खान्देश रत्नांचा जाणीव पुरस्कार देउन गौरव करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरणासाठी स्व. कवी शांताराम नांदगावकर, स्व. डॉ. श्रीराम लागू, स्व. निळू फुले, स्व. पद्मश्री शाहीर साबळे, अॅड. उज्वल निकम, पं. सुरेश वाडकर आदी मान्यवरांना पाचारण करण्यात आले होते.
यंदा कोवीड काळात न दिलेले पुरस्कार सुध्दा वितरीत केले जातील. म्हणजेच २०२१ ते २०२४ या दरम्यानचे पुरस्कार वितरण खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते वितरीत होतील.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोवीड रूग्णांचे प्राण वाचविणारे डॉक्टर्स, परिचारक, अॅब्युलन्स ड्रायव्हर, पोलीस आदीं चा सन्मान केला जाईल. त्यात डॉ. अभय शिनकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. संजय संघवी, सचिन शेवतकर, सुनिल पुंड, डॉ. अश्विनी राजपूत, मोनाली सैंदाणे, गोकुळ राजपूत, प्रकाश बाविस्कर, अबु अन्सारी यांना सन्मानित करण्यात येत आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. शकील कुरेशी (महिला शिक्षण), श्रावण वाणी (लोक कला), राहुल जगताप (सामाजिक), प्रतिभा घोडके (वैद्यकीय सेवा), भाग्यश्री कुलकर्णी (समाजसेवा), पपीता जोशी, कल्याणी कचवाह (सांस्कृतिक), प्रशांत मोराणकर, योगीराज मराठे, उमेश चौधरी (सामाजिक), यशवंत हरणे (पत्रकारीता) या मान्यवरांना जाणीव पुरस्कार देउन सन्मानीत करण्यात येईल.
उपस्थितीचे आवाहन प्रा. डॉ. गायत्री चव्हाण, प्रा. डॉ. जयश्री गावीत, राजू नाना चौधरी, प्रा. डॉ. संजय चव्हाण, डॉ. सुरेश जाधव या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.