मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रम्हे यांचा सत्कार सोहळा
धुळे : नामदार शैलेश पी. ब्रम्हे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल धुळे येथे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे. यावेळी धुळे न्यायालयात ४० वर्ष वकिली करणा-या जेष्ठ विधीज्ञांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. नितीन बी. सुर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तसेच धुळे जिल्हा पालक न्यायमुर्ती श्री. एस. जी. मेहरे उपस्थित राहणार आहेत. धुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होईल. अशी माहिती धुळे जिल्ह वकील संघांचे अध्यक्ष ऍड. आर. डी. जोशी यांनी आज दिली आहे.
२४ फेब्रुवारी २०२४ रोजी हिरे भवन येथे सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. नामदार शैलेश पी. ब्रम्हे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येईल. यावेळी उपस्थित मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत. धुळे न्यायालयात तब्बल ४० वर्ष वकिली क्षेत्रात योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधीज्ञांचा गौरव व सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.
सत्कार मुर्तीमध्ये अँड. सतिष आर. पाटील, अँड. शिवदास बी. पाटील, अँड. एस. जे. भामरे, अँड.टी. आर. पाटील, अँड.ए.एस. वाघ, अँड. एन. जे. देव, अँड.एम. झेड. देवरे, अँड. डी. आर. पाटील, ऍड. एस. एस. ठाकवाणी, अँड. डी. वाय. खैरनार, अँड.डी. बी. अग्रवाल, अँड.डी. जी. ब्राम्हणकर, अँड. एस. एस. पाटील, अँड.एल.आर. काकुस्ते, अँड.ए.एम.शहा, अँड. ए. एम. देसर्डा, अँड.बी.पी. पवार, अँड. डी. जे. तंवर, ऍड. व्ही एम. भामरे, ऍड. डी.पी. सोनार, अँड.ए.बी. शहा, अँड. आर. यु. पाटील, अँड. एस.डी. पाटील, अँड. आर. एस. सोनवणे, अँड. एस. के. महाजन यांचा समावेश आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. मधुकर भिसे, अँड. प्रभावती माळी, सचिव अँड. दिनेश गायकवाड, अँड. पुरुषोत्तम महाजन, अँड. सुधा जैन, कार्यकारणी सदस्य अँड. जमिल पठाण, अँड. राकेश मोरे, अँड. सचिन जाधव, अँड. सिध्देश पाटील, अँड. संतोष केदार, अँड. कैलास माळी, अँड, योगेश चितळकर, अँड. सारंग जोशी, अँड. उमाकांत घोडराज, अँड. शोभा खैरनार, अँड. भारती शिरसाठ परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकिल बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन धुळे जिल्हा वकील संघांचे अध्यक्ष अँड. आर.डी. जोशी यांनी केले आहे.