धुळ्यात महात्मा फुले नगरात साकारतंय विपश्यना केंद्र
धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे विपश्यना केंद्र बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते तक्षशिला बुद्ध विहार, महात्मा जोतिबा फुले नगर, मोगलाई येथे झाला. निव्वळ भपकेबाज कार्यक्रम न घेता धुळे शहरातील सर्व घटकांचे सर्वांगीन विकासाचे ध्येय डोळ्यासमोर असल्यानेच विपश्यना केंद्र सारखा अभिनव प्रयोग राबविता आल्याचे प्रतिपादन आमदार शाह यांनी केले.
मोगलाई तक्षशिला बुद्ध विहार, म. जोतिबा फुले नगर, येथे बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार फारुख शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी निवडून आल्यानंतर शहरात समस्यांची प्रचंड मोठी जंत्री होती. ही एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पूर्वाश्रमीच्या लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेची पावती होती. त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रश्नांबाबतीत चिंतन करावे लागले आणि त्यातून समस्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त झाला. निव्वळ रस्ते, गटारी, कुंपण भिंत, उद्यान, पथदिवे यासारखी कामे करून चालणार नाही तर शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका, विपश्यनागृहाची निमिर्ती आवश्यक आहे. म्हणून शहरात दोन विपश्यना केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्या. आज त्या प्रत्यक्षात येत असल्याने विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. फारुख शाह यांनी याप्रसंगी केले.
ऍड. विलास झाल्टे, इंजि. अविनाश थोरात, ऍड. मधुकर भिसे, सलीम शाह, माजी नगरसेवक नासिर पठाण, गणी डॉलर, सईद बेग, एस. यू. तायडे, आनंद लोंढे, साहेबराव लोंढे, किसन बागुल, हरिश्चंद्र लोंढे, देविदास जगताप, प्रभाकर खंडारे, गुलाबराव लोंढे, निजाम सय्यद, बी. यू. वाघ, मधुकर निकुंभे, शरद वेंदे, संजय अहिरे, ईश्वर खैरनार, जेतवन मोरे, प्यारेलाल पिंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद सैंदाणे यांनी केले तर आभार रवी नगराळे यांनी मानले. यावेळी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान बागुल, चंद्रकांत बागुल, ईश्वर जाधव, चंद्रभान लोंढे, विलास भामरे, देविदास घोडसे, तेजस उशीरे, प्रशिक भामरे, योगेश बिऱ्हाडे, यतीन सरदार, मुकुंद भामरे, सचिन अहिरे, कुणाल अहिरे, गौतम बिऱ्हाडे, अरिहंत सरदार, शुभम भामरे, अविनाश शिरसाठ, यश पवार, रोहित निकम, शुभम अहिरे, शुभम नेरकर, विशाल केदार, रवींद्र वाघमारे, नितीन बागुल, अमोल भामरे यांनी परिश्रम घेतले.