ज्याेती बाेरसे, साेनी कदम यांची सभापतीपदी बिनविराेध निवड
धुळे : जिल्हा परिषदेच्या दाेन विषय समितीच्या सभापतींची शुक्रवारी (ता. 01-03-2024) बिनविराेध निवड करण्यात आली. त्यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावर काॅन्ट्रॅक्टर देवाबापूंच्या धर्मपत्नी, वर्षी गटाच्या सदस्या ज्याेती देवीदास बाेरसे यांची तर अन्य एका विषय समितीच्या सभापतीपदावर खलाणे गटाच्या साेनी कदम यांची बिनविराेध निवड करण्यात आली. निवडीनंतर भाजप समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात फटाके फाेडून व ढाेलताशांचा गजर करीत आनंदाेत्सव साजरा केला. दाेन्ही सभापती ह्या भाजपाच्या आहेत. या सभेला एकूण ३८ सदस्य उपस्थित हाेते.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती संजीवनी सिसाेदे, शिक्षण व आराेग्य सभापती महावीर रावल यांनी पक्षधाेरणानुसार राजीनामा दिला हाेता. त्यांच्या रिक्त जागांवर नवीन सभापती निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात पिठासिन अधिकारी तथा प्रातांधिकारी राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित हाेते.
सभापती निवड प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. त्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चाैधरी, कामराज निकम, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी सभागृहात येत भाजपाकडून ज्याेती देवीदास बाेरसे व साेनी कदम यांनी सभापतीपदासाठीचे अर्ज पिठासिन अधिकाऱ्यांकडे जमा केले. त्यानंतर निवड सभेला दुपारी ३ वाजता सुरूवात झाली. नियमानुसार अर्जांची छाननी करीत दाेन्ही सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याचे जाहीर केले. या अर्जांच्या माघारीसाठी ३.२५ पर्यंत मुदत देण्यात आली. परंतु मुदतीत काेणीही माघार न घेतल्याने पिठासिन अधिकारी राहुल जाधव यांनी महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्याेती बाेरसे यांची बिनविराेध निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अन्य एका विषय समिती सभापतीपदासाठीही एकमेव अर्ज असल्याने साेनी कदम यांचीही बिनविराेध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर दाेन्ही सभापतींना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला.
यावेळी भाजप समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात फटाक्यांची आतिषबाजी करीत व ढाेलताशांच्या गजरात ठेका धरत आनंदाेत्सव साजरा केला. निवडीनंतर अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष बबन चाैधरी, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, संजीवनी सिसाेदे, तुषार रंधे, सुधीर जाधव, कामराज निकम, संग्राम पाटील, आशुताेष पाटील, राघवेंद्र भदाणे यांच्यासह इतर भाजपाच्या सदस्यांकडून नूतन सभापतींचा सत्कार केला.
सर्वसाधारण सभेत आराेग्य सभापतीची घाेषणा : नियमानुसार शिक्षण व आराेग्य विषय समिती सभापतीच्या नावाची घाेषणा सर्वसाधारण सभा घेवून करावी लागते. त्यामुळे शुक्रवारी केवळ महिला व बालकल्याण सभापतींची घाेषणा करण्यात आली. आराेग्य सभापतीपदावर साेनी कदम यांची निवड निश्चित असली तरी त्यांच्या नावाची घाेषणा ही सर्वसाधारण सभेत केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महिला सभापती ह्या वर्षी गटातून निवडून आल्या असून ठेकेदार डी. आर. बाेरसे-पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. तर साेनी कदम ह्या खलाणे गटाच्या सदस्या आहेत. त्या आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थक आहेत.