वीर सावरकर स्मारक सुशोभिकरण कामाचा शुभारंभ
धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काॅंग्रेस पक्ष सातत्याने विखारी टीका करीत आला आहे. परंतु काॅंग्रेसकडून होणारा सावरकरांचा अवमान धुळे शहरातील जनता यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिला. सदभावना, त्याग, देशासाठी बलिदान, एकतेचे प्रतिक असणारे थोर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी व स्पुर्तीदायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वांतत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे धुळे शहरातील स्मारक जीर्ण झाले होते. तसेच त्याची दुरावस्था झालेली होती. त्यामुळे या स्मारकाचे सुशोभिकरण व नुतनीकरण कामाचे भूमिपुजन शनिवारी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिका विकास शुल्क निधी अंतर्गत या पुतळयाच्या सुशोभिकरण व नुतनीकरण करण्यासाठी सुमारे एक कोटी खर्चांचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामात पुतळा परिसर सुशोभिकरण, रेलिंग, छोटा बगीचा कामांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर सौ. प्रतिभा चौधरी यांनी केले.
महामंत्री विजय चौधरी म्हणाले की, वीर सावरकर यांचे स्मारक हे अनेक वर्षांपासून सर्वांना त्याग व देशाकरिता बलिदान कसे दिले जाते, याचा संदेश देत आले आहे. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे आज सुमारे एक कोटी खर्चातून स्मारकाचे नुतनीकरण होऊन कायापालट केला जाणार आहे. त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता केलेलं काम अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.
खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, महापौर प्रतिभा चौधरी यांना जरी आठ महिन्यांचा अत्यंत कमी कालावधी मिळाला तरी त्यांनी, भाजपने धुळेकरांना दिलेले वचन पूर्ण करण्याचे काम केले. दोन दिवसाआड पिण्याचे पाणी असो, वीर सावारकर यांचे स्मारक असो असे विविध कामांसाठी त्यांची आग्रही भूमिका होती. या स्मारकामुळे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल. विभाग संघचालक प्रशांत मोराणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला मदनलाल मिश्रा, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, विभाग कार्यवाह राजेश पाटील, शहर संघचालक संजय देसले, माजी शहर संघ चालक साहेबचंद जैन, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे , नाशिक विभागीय अध्यक्ष महेश मुळे, प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी सभापती सुनील बैसाणे, माजी नगरसेवक नरेश चौधरी, प्रदेश ओबीसी उपाध्यक्षा मायादेवी परदेशी, माजी सभागृह नेत्या भारती माळी, प्रदेश सदस्या डॉ. माधुरी बाफना, महिला भाजप अध्यक्षा वैशाली शिरसाठ, सरचिटणीस ओम खंडेलवाल, सरचिटणीस यशवंत येवलेकर, भाजप प्रवक्ता पृथ्वीराज पाटील, सरचिटणीस चेतन मंडोरे, आर्किटेक्ट योगेश ठाकरे, सागर चौधरी, अरुण पवार, अमोल चौधरी, हेमंत मराठे, संजय बोरसे, डॉ. महेश घुगरी, शेखर कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, निशा चौबे, गीता कटारिया, आरती महाले, आरती पवार, मंगला पाटील, सुरज चौधरी, अजय कासोदेकर, प्रा. अतुल पाटील, प्रा. संजय देवरे, प्रा. जयेश कोरसर, प्रा. चेतन देवरे, बिपीन रोकडे, कमलाकर पाटील, जयंत वानखेडकर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब खेमनार, डॉ. चेतन पाटील, मुन्ना शितोळे, चंद्रकांत महाजन, वैभव सयाजी, आदित्य शाह, योगेश चौधरी, विकास चौधरी, दिनेश चौधरी, सचिन आखाडे, जिग्नेश खैरनार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन कामाचे सुचक व निमंत्रक माजी महापौर प्रतिभा चौधरी आणि मनपातर्फे करण्यात आले होते.