शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन यांच्या विधानसभा संपर्क कार्यालयाचे भुमिपुजन
धुळे : शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ. सुशील महाजन यांचे संपर्क कार्यालय देवपूरातील शारदानगर प्लाॅट क्रमांक 4 येथे सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. धुळेकरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सुशील महाजन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
लोकसभा निवडणुकीसोबतच नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेचे पडघम वाजु लागले आहेत. त्यानुसार धुळे शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशील काशिनाथ महाजन यांनी त्यांच्या विधानसभा संपर्क कार्यालयाचे मंगळवारी भूमिपूजन केले. या कार्यालयात भविष्यात धुळेकर जनतेचे निरनिराळे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाईल. त्याचप्रमाणे धुळे शहरवासियांची विविध कामे, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, आभा कार्ड, रेशन कार्ड व इतर सर्व महत्त्वाचे शासकीय दस्तावेज तयार करून मिळतील.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यांचे विचार सक्षमपणे पुढे घेऊन जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हा वसा घेत धुळे शहरात डॉ. सुशील महाजन यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने ते धुळे शहर विधानसभेतील प्रभावी उमेदवार म्हणून धुळेकरांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते शिवसेना पक्षाचे अविरत व एकनिष्ठपणे काम करीत आहेत. विधानसभा संपर्क कार्यालय हे धुळेकर जनतेच्या सेवेसाठी लवकरच खुले होणार आहे. त्याचप्रमाणे या संपर्क कार्यालयातून शिवसेनेचे महत्त्वाचे कार्यक्रम व निर्णय राबवले जाणार आहेत.
विधानसभा संपर्क कार्यालय भुमिपुजन कार्यक्रमाला हिलाल माळी, किरण जोंधळे, धीरज पाटील, भरत मोरे, रामदास कानकाटे, शेखर वाघ, मच्छिद्र निकम, संजय जवराज, शरद गोसावी, महादू गवळी, छोटू माळी, संदीप चौधरी, कैलास मराठे, शत्रुघ्न तावडे, दिनेश पाटील, वैभव पाटील, छोटू माळी, हरिष माळी, मनोज जाधव, कुणाल कानकाटे, सागर निकम, अमजद पठाण, सोनी सोनार, संतोष शर्मा, प्रफुल्ल पाटील, विकास शिंगाडे, अनिल शिंदे, सोनू माळी, मुन्ना पठाण, अरुण धुमाळ, सुनील चौधरी, संदीप चव्हाण, रवींद्र बिल्हाडे, पुरुष्योतम पहिलवान, राजेंद्र पाटील, नंदू फुलपागरे, जयश्री वानखेडे, तेजस सपकाळ, विक्की परदेशी, डॉ. योगेश ठाकरे, डॉ. किर्ती ठाकरे, डॉ. विशाल पाटील, डॉ. मेघना पाटील, डॉ. अभय शिणकर, डॉ. सिद्धार्थ पाटील, डॉ. राहुल बच्छाव, डॉ. तुषार कानडे, डॉ. रवि सोनवणे, डॉ. मिलिंद पवार, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. हन्नान काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.