पाली भाषा परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिकं देऊन गौरविलं
धुळे : नागपूर येथील बुद्ध विहार समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीमार्फत पाली भाषा परीक्षांचं आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात आलं होतं. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुला-मुलींना पारितोषिकं देऊन गौरविण्यात आलं.
धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथील पाली भाषा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभाच्या विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गौतम शिलवंत, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. सुरेश बिऱ्हाडे, इंजि. जी. बी. पवार, विजयकुमार दामोदर, विद्याताई तायडे, प्रा. विलास चव्हाण, पी. यु. पवार, व्ही. टी. गवळे, बी बी. साळवे, भारती शिंदे, नानासाहेब देवरे, देविदास जगताप उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी बी. यु. वाघ होते.
या परीक्षांमध्ये शहरी व ग्रामीण भागातून विशेष नैपुण्य संपादन केलेले उपासक व उपासिका तसेच परीक्षांच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध विहार समन्वय समितीचे कार्याध्यक्ष व्ही. टी. गवळे यांनी बुद्ध वंदना घेऊन केली. बक्षिसपात्र उपासक व उपासिका यांनीही पाली भाषा विषयी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ. गौतम शीलवंत आणि डॉ. दीपक शेजवळ यांनी बुद्ध विहार समन्वय समितीच्या कार्याचं कौतुक करताना सांगितलं की, आपण सर्वांनी बुद्ध धम्माचे विचार प्रामाणिकपणे आचरणात आणणे अत्यंत आवश्यक आहे. बुद्ध धम्माच्या सर्व चालीरीती या विज्ञानावर आणि सत्यावर आधारित आहेत. आपल्या धार्मिक विधी संस्कारात कुठलेही कर्मकांड करता कामा नये, असं सांगितलं. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बी. यु. वाघ यांनी सांगितलं की, बुद्ध विहार समन्वय समिती धुळे जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचं काम करीत आहे. आपण एकदा बुद्ध धम्म स्वीकारला तर शेवटपर्यंत बुद्धच राहीन, असं प्रत्येकानं आचरण करुन सिद्ध करावं, असा मौलिक विचार मांडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. बी. साळवे, सुभाष निकुंभे, किशोर शेजवळ, जी. डी. जाधव, रोटे सर, शहाजी शिंदे, विनोद चव्हाण, दीपक गुलाले, सिद्धार्थ जाधव, शाहीर गांगुर्डे, चतुर चित्ते आदींनी परिश्रम घेतल. पाली भाषा पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक बी. बी. साळवे यांनी केलं. सूत्रसंचालन जिल्हा सचिव राजेंद्र थोरात यांनी केलं तर पुष्पाताई शिरसाठ यांनी आभार मानले.