काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यात
धुळे : काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज 13 मार्च रोजी धुळे शहरात आगमन होत आहे. राहूल गांधी यांचे 12 मार्च रोजी धुळे जिल्ह्यात आगमन झाले असून, त्यांची यात्रा दोंडाईचा येथे मुक्कामी होती. त्यांच्या उपस्थितीत धुळ्यात रोड शो, चौक सभा आणि महिला हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांचा आजचा नियोजित दौरा असा : भारत जोडो न्याय यात्रेचा धुळे जिल्ह्यात बुधवार 13 मार्च रोजीचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. 13 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता खासदार राहूल गांधी दोंडाईचा येथून धुळ्याकडे निघतील. सकाळी 8.15 वाजता चिमठाणे येथील क्रांती स्मारकाला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 9 वाजेपासून ते 10.45 वाजेदरम्यान सोनगीर, सरवड फाटा, देवभाने फाटा, नगाव, नगाव बारी, दत्त मंदिर धुळे, एसएसव्हीपीएस कॉलेज धुळे, देवपूर मशिद, धुळे येथे राहूल गांधी यांचे रॅली मार्गावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत. तर सकाळी 11.10 वाजता कराचीवाला खुंट येथे शिवसेना (उबाठा) पदाधिकारी राहूल गांधी यांचे स्वागत करतील. सकाळी 11 ते 11.30 वाजेदरम्यान महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मनोहर टॉकीजपर्यंत पदयात्रा होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीजजवळ राहूल गांधी यांची चौक सभा होईल. धुळे येथील वालचंद बापूजी गृपचे देश विदेश हॉटेल, रेसीडेन्सी हॉटेलच्यासमोर सुरत बायपायसजवळ धुळे येथे दुपारी 12 वाजता होणार्या महिला हक्क परिषदेला ते संबोधित करतील.
या नेत्यांची उपस्थिती : भारत जोडो न्याय यात्रेत राज्यातील तसेच दिल्लीतील दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. त्यात काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, काँग्रेस कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, शिवसेना नेते अशोक धात्रक, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे, प्रवक्ता अतुल लोंढे, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष नाना गवांदे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
धुळे जिल्हा काँग्रेसमय : राहूल गांधी याच्या स्वागतासाठी धुळे शहर सज्ज झाले असून, त्यांचे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या आगमनामुळे धुळे शहरात आणि जिल्ह्यात काँग्रेसमय वातावण आहे. दौरा मार्ग आणि सभा स्थळांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी तसेच काँग्रेस पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पहाणी केली.
जनतेमध्ये उत्साह : भारत जोडो यात्रेबाबत माहिती देतांना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले कि, भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त आमचे नेते खासदार राहूल गांधी यांचे धुळ्यात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची धुळे जिल्ह्यात जय्यत तयारी झाली आहे. राहूल गांधी धुळे जिल्ह्यात येत असल्याने गावागावात उत्साह आहे. त्यामुळे जनतेमध्ये भारत जोडो यात्रेची उत्स्कूता निर्माण झाली आहे. कमी वेळेत आणि आचारसंहिता लक्षात घेवून राहूल गांधी हे वाहनातून भारत जोडो न्याय यात्रा करीत आहेत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून निघाल्यावर प्रत्येक मार्गावर लागणार्या प्रत्येक गावात त्यांचे स्वागत केले जाणार आहे. धुळ्यात आल्यावर राहूल गांधी हे महात्मा गांधी पुतळ्यापासून आग्रारोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा करणार आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले आहे.
महिला न्याय हक्क परिषद : भारत जोडो न्याय यात्रेचे औचित्य साधून राहूल गांधी यांच्या उपस्थितीत धुळे येथे 13 मार्च रोजी दुपारी 12 ते 1 वाजता महिला हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागूल राहीले आहे. महिला हक्क परिषदेला तब्बल पंधरा हजार महिला उपस्थित राहणार आहेत. गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, आणि अश्विनी कुणाल पाटील या स्वत: महिला परिषदेची तयारी करुन घेत आहेत.
देशाचे नेते खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. भारत जोडो न्याय यात्रा 12 आणि 13 मार्च रोजी धुळ्यात राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते कंबर कसुन तयारीला लागले आहे. रॅली मार्गासह धुळे शहरात विविध चौकात झेंडे, बॅनर लागले असून सर्वत्र काँग्रेसमय वातावरण आहे. खा.राहल गांधी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर 12 मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत रॅली मार्ग तसेच सभा स्थळांची पहाणी केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मनोहर टॉकीजजवळ राहूल गांधी यांची चौक सभा होणार आहे. तर धुळे येथील वालचंद बापूजी गृपचे देश विदेश हॉटेल, रेसीडेन्सी हॉटेलच्यासमोर सुरत बायपायसजवळ धुळे येथे महिला हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला हक्क परिषदेचे ठिकाण आणि चौक सभेच्या जागेची आमदार कुणाल पाटील यांच्यासमवेत माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, अश्विनी कुणाल पाटील, शिवसेनेचे महेश मिस्तरी, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, राजेंद्र शिंदे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, पंढरीनाथ पाटील, साबीर खान, पितांबर महाले, राजीव पाटील, संचालक कुणाल पाटील, रावसाहेब पाटील, बापू खैरनार, हरिष पाटील, सागर पाटील उपस्थित होते.