खासदारांनी विकासकामांचा शुभारंभ केलेल्या जागेवर मुळ मालकाच्या वारसदाराचा दावा
धुळे : खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मोठा गाजावाजा करत व्यापारी गाळे बांधकामाचा शुभारंभ केलेल्या दसरा मैदानाच्या जागेवर मुळ मालकाच्या वारसदाराने सातबारा उताऱ्याऱ्याच्या पुराव्यासह दावा केल्याने महानगरपालिकेचा गैकारभार चव्हाट्यावर आला आहे.
अलिकडेच महापालिकेच्या माध्यमातून भव्य उभारल्या जाणार्या व्यापारी संकुलाचे ज्या जागेवर भुमीपूजन झाले ती दसेरा मैदानची जागा आमचीच, त्यासाठी न्यायालयात लढा देणार अशी भुमीका घेत या जागेचे एक मालक कृष्णा अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अग्रवाल म्हणाले की, दसेरा मैदानची जागा आमचीच आहे. सीटीसर्वेला देखील आमच्याच कुटूंबियांची नावे लागली आहेत. तत्कालीन पालिकेने या जागेवर आरक्षण बसविल्यानंतर जागेचा मोबदला तीन लाख रुपये पालिकेने देवू केला होता. परंतु आम्ही तो घेतला नाही. गार्डनसाठी जागेचे आरक्षण टाकण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने आम्हाला जागा नको असे म्हटले होते.असे असताना पुन्हा मनपाने जागा आमचीच असल्याचे सांगितले. आम्ही भक्कम पुरावे गोळा करीत असून याप्रकरणी न्यायालयात लढा देणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.